काही दिवसापूर्वी सनी अहिवळे यांनी मंगळवार पेठेत वृक्षारोपण यशस्वी रित्या राबविले होते. तर कोरोना काळात जनतेले दिलेला मदतीचा हात लाख मोलाचा होता
फलटण : धैर्य टीम
विधान परिषदेचे सभापती मा. ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व कळावे या हेतूने सुरु केलेले
आणखी एक पाउल स्वच्छतेकडे या अभियानात स्वयंम प्रेरणेने प्रभाग क्रमांक २ चे मा.नगरसेवक सनी दादा अहिवळे , सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा मा सौ सुपर्णा सनी अहिवळे यांनी मंगळवार पेठ फलटण येथील रस्ते,गटर स्वच्छता करीत अनोखा संदेश दिला.
मा.नगरसेवक सनी अहिवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया चॅरिटेलच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा सनी अहिवळे हे सातत्यपूर्ण आपल्या कार्यातून इतरांना संदेश देत असतात. मंगळवार पेठ फलटण येथे काल दि.१२ जून रोजी आपल्या सहकार्यासह त्यांनी गटर त्याच बरोबर रस्त्यांची साफसफाई केली. स्वच्छतेचे काम सुरु होताच त्यांच्या बरोबर महिलांसह लहान मुले व मुली यांनीही सहभाग घेतला.
काही दिवसापूर्वी सनी अहिवळे यांनी मंगळवार पेठेत वृक्षारोपण यशस्वी रित्या राबविले होते. तर कोरोना काळात जनतेले दिलेला मदतीचा हात लाख मोलाचा होता
फलटण च्या विविध प्रभागातील नगरसेवकांनी विविध प्रकारे समाज उपयोगी कामे केल्यास व सर्वांना स्वच्छतेचे महत्व लक्षात आणून दिल्यास फलटण शहर आणखी स्वच्छ होण्यास नक्कीच मदत होईल.



















