Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा

भीमजयंती फलटणमध्ये मोठया उत्साहात संपन्न : शोभायात्रेचा खा. रणजितसिंह यांच्या हस्ते शुभारंभ

टीम : धैर्य टाईम्स
श्रीमंत रामराजे यांच्या कडून भीमजयंतीच्या शुभेच्छा : दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त निघालेल्या शोभयात्रेस भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

 फलटण : (प्रतिनिधी )

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती फलटण शहर व तालुक्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. पंचशील चौक, फलटण येथून निघालेल्या भव्य शोभयात्रेचा शुभारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी तालुक्याचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे - पाटील, ॲड. नरसिंह निकम, पिंटू इवरे, अमीर शेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे सदस्य जेष्ठ नेते विजयराव येवले, मुन्ना शेख, संजय अहिवळे, संजय निकाळजे, राजू मारुडा, सुधीर अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सायंकाळी सात वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व त्यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचे चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून भीम सैनिकांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळपासून नगर परिषद कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महोत्सव समितीच्यावतीने संपूर्ण परिसरात रोषणाई तसेच सजावट केली होती. याच ठिकाणी दिल्ली येथील संसद भवनाची प्रतिकृती साकारत भारताचे संविधान व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. शहर व तालुक्यातील अन्य संस्था, संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार, उद्योजक व शहरवासीय तसेच तालुक्याच्या विविध भागांतून आलेल्या आबालवृद्धांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER