Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ?

कराड तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव

आरोग्य विभाग सतर्क : ग्रामपंचायतींनीही विविध उपाययोजना करण्याचे आवाहन
टीम : धैर्य टाईम्स
Outbreak of Chikun Gunia-like epidemic in Karad taluka
अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.

कराड : तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.
यामध्ये तालुक्यात दक्षिण भागातील विशेषत: रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या पाच गावांमध्ये सुमारे आठवडाभरापासून चिकुन गुनिया सदृश्य शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सध्या तालुक्यातील  वेगवेगळ्या ठिकाणी हे रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, चिकुन गुनिया सदृश्य आजाराच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणाचे रुग्ण आढळून येत असलेल्या तालुक्यातील गावागावात रुग्ण सर्व्हे, रक्त नमुन्यांचे संकलन, गरजूंना औषधांचे वाटप व डासांच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याची मोहिम आरोग्य विभागाकडून हाती घेण्यात आली आहे.
गत आठवड्यात कराड तालुक्यासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली होती. या पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाण्याची डबकी साचली असून ओढे, नालेही तुडूंब भरून वाहत होते. पाऊस ओसरल्यानंतर मात्र डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना सर्दी, खोकला, तीव्र ताप आणि सांधे आखण्याच्या वेदना आदी. चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. परंतु, त्यासंबंधित तपासणी केल्यास त्याचा अहवाल नील येत आहे. मात्र, रुग्णांना चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाची लक्षणे आढळून येत आहेत. ही सर्व लक्षणे चिकुन गुनिया सदृश्य असल्याचे डॉक्टरांकडूनही सांगण्यात येत आहे.
तालुक्यातील रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या गावात गत दहा ते बारा दिवसांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचे शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गावातील खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे चिकुन गुनिया सदृश्य साथीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणाही सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाकडून रेठरे बुद्रूक, आटके, हणबरवाडी, कालवडे, बेलवडे बुद्रूक या गावांशी संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या वतीने आशा सेविका, सुपरवायझर यांच्यामार्फत रुग्ण सर्व्हे करण्यात येत आहे.
सर्व्हेमध्ये काही संशयीत रुग्णांचे रक्ताचे नमुने घेवून तपासणीसाठी सातारा येथील पब्लिक हेल्थ लॅबकडे पाठविले जात आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या वतीने गरजू रुग्णांना ताप, सर्दी खोकल्यांच्या औषधांचे वाटप केले जात आहे. त्याचबरोबर गावातील सांडपाणी साठणाऱ्या ठिकाणी डासांच्या अळ्या निर्मुलनासाठी ॲबटींग केले जात आहे. नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतींनी फॉगिंग मशीनच्या सहाय्याने गावात धुरीकरण करावे, तसेच गटारे वाहती करावीत, फ्रीजच्या ट्रेमध्ये डासांच्या अळ्या आहेत का? याची तपासणी करावी, टायर, नारळाच्या करवंटया यांमध्ये पावसाचे पाणी चासू देऊ नये, आदींची काळजी घेण्याचे आवाहनही तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

औषधांचा साठा मर्यादित
चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचा तालुक्यातील काही गावात फैलाव झाला आहे. परंतु, आरोग्य विभागाकडे त्यासाठी आवश्यक औषधांचा साठा मर्यादीत असून  या औषधांचा गरजू रुग्णांसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनीही गावात या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत आरोग्य विभागाकडून लेखी कळवण्यात आले आहे. हेल्थ वेलनेस सेंटर (पीएसी) व उपकेंद्रांमधील ओपीडीमध्ये रुग्णांवर दैनंदिन औषधोपचार केले जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल कोरबू यांनी दिली.

सध्या, तालुक्यातील काही गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य साथीच्या रोगाचा फैलाव झाला आहे. परंतु, तपासणीत सदरचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत नाहीत. सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी आदी. लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून संबंधित गावांत रुग्ण सर्व्हे, डास अळ्यांचे निर्मूलन व त्यासाठी ॲबिटींगचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांना कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन केले जात आहे.
- डॉ. सुनिल कोरबू, तालुका आरोग्य अधिकारी, कराड.  

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER