फलटण प्रतिनिधी : ज्ञानोबा माऊली तुकाराम.. तुकाराम’सह विठ्ठल नामाच्या जयघोषात व टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करणारा लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी महानुभाव व जैन पंथीयांची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फलटणनगरीत एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला. यावेळी राजमाता अहिल्यादेवी गणेश मंडळ आणि लायन्स क्लब फलटण गोल्डन यांचे संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांच्या करीता अल्पोपहार व वारकऱ्यांची नेत्र तपासणी करून चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदिप चोरमले यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदिप चोरमले तसेच लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या नूतन अध्यक्षा लायन सौ. स्वाती चोरमले, एम. जे. एफ. ला. भोजराज नाईक निंबाळकर ,ला.मंगेशशेठ दोशी, अध्यक्ष ला. जगदीश करवा, अध्यक्ष ला.सौ. निलम देशमुख, ट्रेझरर ला सौ.संध्या गायकवाड,ला. सौ. सुनिता कदम, चंद्रकांत कदम ला. निकम साहेब सौ. सोनाली बेडके,अजिंक्य बेडके नेताजी चोरमले, प्रशांत काळे, विठ्ठल चोरमले,तुषार चोरमले, सुभाष चोरमले,राजूनाना चोरमले राहुल शहा, राजाभाऊ देशमाने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. नेत्र तपासणी साठी डॉ.बाबर आणि डॉ. लता मोरे तसेच समाजसेविका सौ प्रिती भोजने मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











