सखी
नव्या शतकाची तू तेजस्विनी
नव्या युगाची तू क्रांतीज्योती!
दाही दिशातून तुझ्या
कर्तुत्वाचे दीप उजळती
स्त्री-पुरुषांची समानता
नको केवळ कागदावरी|.
प्रत्यक्षात साकाराया.
तू अन तूच संघर्ष करी|
नवीन वारे घेऊन ये तू
नव्या विचारांचा वसा
तुझ्या अमोघ कर्तुत्वाचा
उमटू दे कणाकणात ठसा |
जिजाऊ झाशीची राणी
यांचा घेऊ या सदा आदर्श!
कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी
केला त्यांनी जीवनभर संघर्ष
उठ -उठ पेटून आता तू
तुझिया न्याय हक्कासाठी|
दे लढा सखी आत्ता तू
तुझिया अस्तित्वासाठी|
जबाबदारी पार पाडताना
घे आनंद क्षणाक्षणाचा |
जगशील तू तुझ्यासाठी
तोच क्षण असेल सौख्याचा|
जीवनाच्या संघर्ष वाटेवर
वाईट प्रसंग विसरूनी
चाल सखी आता पुढे तू
जीवनात नवे रंग भरूनी||
सौ. शर्मिला संजय शिंदे, कोपर्डे, ता. खंडाळा











