Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजन

श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना जाहीर
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी : 


श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटणच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही दि. १४ ते २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून फलटण शहर व तालुक्यातील अबालवृद्धांनी त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची ४७ वी पुण्यतिथी दि. १४ मे २०२५ आणि माजी आ. श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर तथा श्रीमंत शिवाजीराजे यांची १०० वी जयंती दि. २५ मे २०२५ रोजी येत असून त्या निमित्ताने श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठाच्यावतीने दि. १४ ते २५ मे दरम्यान स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


दि. १४ मे रोजी स्मृती महोत्सवाचे उद्घाटन आणि श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार वितरण महाराष्ट्र विधानपरिषद माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.


श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार सहकारमहर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना जाहीर झाला असून त्यांच्यावतीने डॉ. विनय कोरे यांच्याकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


गुरुवार, दि. १५ मे रोजी स्वरश्रृती हा श्रीकांत सावंत प्रस्तुत जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. शुक्रवार, दि. १६ मे रोजी 'गिर्यारोहण काळाची गरज व तरुणाईला आवाहन' या विषयावर दिलीप केशवराव नाईक निंबाळकर यांचे व्याख्यान होणार आहे. माजी आ. दीपक चव्हाण हे अध्यक्षस्थानी असतील. शनिवार, दि. १७ मे रोजी सुप्रसिद्ध गायक आनंद भीमसेन जोशी यांचा संतवाणी हा कार्यक्रम होणार आहे.


रविवार, दि. १८ मे रोजी 'छ. राजाराम महाराज, महाराणी ताराबाई साहेब आणि मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा' या विषयावर प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्ष स्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील.


सोमवार, दि. १९ मे रोजी मी जिजाऊ बोलतेय हा एकपात्री नाट्य प्रयोग व व्याख्यान : डॉ. प्रतिभा जाधव निकम, नाशिक यांचा होणार आहे. मंगळवार, दि. २० मे रोजी मकरंद टिल्लू हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा हा एकपात्री प्रयोग सादर करतील. बुधवार, दि. २१ मे रोजी 'तापमान बदलाची कृषी ग्रामीण विकासापुढील आव्हाने' या विषयावर पोपटराव पवार यांचे व्याख्यान, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे अध्यक्षस्थानी असतील. 


गुरुवार, दि. २२ मे रोजी बबल शो : बोलक्या बाहुल्या हा शो चैत्राली माजगावकर सादर करतील. शुक्रवार, दि. २३ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी शिक्षक व सेवक कलावंत कलाविष्कार सादर करतील. शनिवार, दि. २४ मे रोजी फलटण एज्युकेशन सोसायटी विविध शाखांतील विद्यार्थी कलावंत कलाविष्कार सादर करतील. रविवार, दि. २५ मे रोजी स्मृती महोत्सव समारोप, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. स्मृती महोत्सवातील दि. १४ ते २५ मे दरम्यान आयोजित सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल प्रांगणातील रंगमंचावर दररोज सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER