Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह यांनी घेतली कुटुंबासह भेट : विविध प्रश्नांवर चर्चा

टीम : धैर्य टाईम्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करतानाच महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील विविध जलसिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत याकरिता निवेदन दिले यावेळी खासदार रणजितसिंह यांच्या बरोबर त्यांच्या सुविद्यपत्नी अँड सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, कन्या ताराराजे व इंदिराराजे उपस्थित होत्या.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ,तेलंगाना, या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू असून या वादात तेलंगाना राज्य सरकार ,सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्रशासन स्तरावर प्रयत्न करावा अशी अपेक्षा यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

कृष्णा - भीमा स्थैरीकरण योजना प्रकल्प मार्गी लावावा यासाठी विशेष योजना तयार करून या 55 दुष्काळी तालुक्यासाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

राज्य सरकारने निरा- देवघर या प्रकल्पास सुप्रीमा देऊन निधीची तरतूद राज्य शासनाने केली आहे हे यावेळी निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पास आता केंद्र शासनाकडून सुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी ही मागणी निवेदनात केली आहे.

तसेच या दुष्काळी पट्ट्यातील धोम - बलकवडी हा प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आत्ता आठमाही होणार आहे तो बारमाही करण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा या निवेदनात करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे - काटापुर योजनेसाठी निधी दिलेला असल्यामुळे हा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागाचा आपण दौरा करावा अशी अपेक्षा यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली. कृष्णा - भीमा स्थैर्रीकरण हा प्रकल्प लवकर मंजूर व्हावा व कृष्णा लवादाच्या निर्णयानुसार एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुसऱ्या नदीच्या खोऱ्यात वळवता येत नसल्याने कृष्णा - भीमा स्थैर्रीकरण योजना पूर्णत्वास नेण्यात येत असलेल्या अडचणी दूर करून यावर उपलब्ध पाणी वाटपाची फेररचना कृष्णा - पाणी तंटा लवाद आयोगाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे यासाठी या आयोगाचा अहवाल महत्त्वाचा असल्याची बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली. या आयोगावर पंतप्रधान मोदींनी लक्ष घालण्याची विनंती यावेळी खासदार रणजितसिंह यांनी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुके कायमस्वरूपी सिंचनाखाली येणार असल्याने शेतकर आर्थिक दृष्ट्या संपन्न होईल अशी अशा यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केली.

 बजेटमध्ये फलटण - पंढरपूर रेल्वे बाबत तरतूद झाली असून रेल्वेचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी संबंधित विभागास आपण सूचना दयावेत अशी ही विनंती खासदार रणजितसिंह यांनी केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER