Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त ओबीसी समाजावर अन्यायाचा निषेध; भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष सागर अभंग यांचा राजीनामा फलटण पंचायत समिती सभापतीपदावरून वाद ? : ओबीसी आरक्षणावर मराठा उमेदवार निवडल्याची चर्चा ? तालुक्यातील ओबीसी नेते मोठा राजकीय भूकंप घडविणार ? विक्रम आप्पा भोसले यांचा भाजपात जाहीर प्रवेश; राष्ट्रवादीचे तीनही पंचायत समिती सदस्य भाजपमध्ये नेत्यांचे ठरलं! फलटण पंचायत समितीत भाजप-शिवसेना फॉर्म्युला महिलांनी फळप्रक्रिया व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व उद्योजिका बनावे - आमदार सचिन पाटील कोळकीत मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; फॉगिंग फवारणीची नागरिकांची मागणी

ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान !

बहुचर्चित मनोमिलनावर अखेर शिक्कामोर्तब
टीम : धैर्य टाईम्स

फलटण - सचिन मोरे 


महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणच्या राजकारणातील कट्टर विरोधक. मात्र कालच झालेल्या फलटण पंचायत समिती सभापती निवडीवेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला बिनविरोध सभापती पद देण्यात आले. तर उपसभापती पदही शिवसेनेला बिनविरोध दिल्याचे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले. वास्तविक सभापती पद हे ओबीसी करीता राखीव आहे. त्या राखीव जागेवर भाजपाच्या मराठा -कुणबी समाजाच्या सदस्या शिवांजली विक्रम भोसले यांना दिल्याने खरा ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.  त्यामुळे जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. 


फलटण पंचायत समितीचे सभापतीपद हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. दोन्हीही पक्षाकडे धनगर समाजाच्या उमेदवार निवडून आलेल्या होत्या त्यांच्यापैकी एकाला सभापती पद मिळेल अशी चर्चा फलटण तालुक्यात रंगली होती. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या विक्रम भोसले यांच्या कन्या शिवांजली भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देत बिनविरोध सभापती पद देण्यात आले. मराठा कुणबी समाजाच्या शिवांजली भोसले यांना सभापती पद दिल्याने धनगर,  माळी यासह विविध ओबीसी समाजातील नेते व कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर ओवाळला तर दोन्ही निंबाळकर जातीय समीकरणात एकत्र असल्याची भावना यावेळी अनेकांनी नाराजीच्या सुरात व्यक्त केली.


ओबीसीचा घास हिसकावला… तालुक्यात पहिला बळी! आता ओबीसी काय करायचे?


तालुक्याच्या राजकारणात घडलेली घटना ही केवळ एका पदाची लढाई नसून, सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर झालेला घाला आहे. ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेले पद इतर समाजाकडे गेल्याने, हा केवळ राजकीय पराभव नाही तर ओबीसींच्या हक्कांवर झालेला अन्याय मानला जात आहे. त्यामुळे “ओबीसीचा घास हिसकावला” ही भावना आज प्रत्येक ओबीसी बांधवांच्या मनात तीव्रतेने उमटताना दिसते.


आरक्षण ही केवळ सोय नाही, तर मागास समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाने दिलेली संधी आहे. पण जेव्हा हीच संधी डावलली जाते, तेव्हा तो विश्वासघात ठरतो. तालुक्यातील ही घटना म्हणजे ओबीसी समाजाच्या हक्कांवर झालेला “पहिला बळी” असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. आज एक पद गेलं, उद्या इतर संधीही अशाच पद्धतीने हिरावल्या जातील का, अशी भीती निर्माण झाली आहे.


ओबीसी समाजाने भावनिक प्रतिक्रिया देण्यापेक्षा संघटित होणे गरजेचे आहे असा मतप्रवाह तयार होऊ लागला आहे. तर एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहणे ही काळाची गरज असून समाजातील नेते, कार्यकर्ते आणि युवकांनी वैचारिक पातळीवर चर्चा करून पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. फक्त सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून आवाज उठवावा लागेल अशी चर्चा आता तालुक्यात होऊ लागली आहे.


शेवटी, हा संघर्ष कोणत्याही समाजाविरुद्ध नसून, आपल्या हक्कांसाठी आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. सामाजिक सलोखा राखत, पण ठामपणे न्याय मागणे हीच खरी दिशा ठरेल.

“ओबीसीचा घास हिसकावला” ही केवळ भावना न राहता, ती एक चळवळ बनली पाहिजे. कारण आजचा बळी हा शेवटचा ठरावा अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER