फलटण प्रतिनिधी -
पत्रकारांचा देव म्हणजे बालशास्त्री जांभेकर. त्यांना पत्रकारिता जगतातील देव मानले जाते कारण त्यांनी भारतातील पहिले मराठी पत्र 'दर्पण' सुरू केले होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव ठेवून "रोख ठोक"पत्रकारिता करीत ग्रामीण भागातील विविध पत्रकारांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.प्रसन्न जोशी सर यांची फलटण येथे ग्रेट भेट झाली.
यावेळी त्यांनी फलटण येथील पत्रकारांना आपले बहुमोल असे मार्गदर्शन केले व खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी प्रसिद्ध अस्थिरोग तद्न डॉ.प्रसाद जोशी उपस्थित होते.या भेटीत ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुढारी चे पोपटराव मिंड,आस्था टाईम्स चे संपादक दादासाहेब चोरमले,दैनिक प्रभात चे तथा माजी नगरसेवक अजय माळवे,दैनिक पुण्यनगरी चे फलटण तालुका प्रतिनिधी तथा देवत्व बेकर्स चे संचालक यशवंत खलाटे पाटील,धैर्य टाईम्स चे संपादक तथा दैनिक साहस वार्ताचे प्रतिनिधी सचिन मोरे,सातारा न्यूज चे प्रतिनिधी राजेंद्र बोंद्रे,श्री हरी सुभाषित चे कार्यकारी संपादक युवा पत्रकार यश सुभाष भांबुरे उपस्थित होते.











