ग्रामविकास खात्याचे मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभही गावाला होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मतदारांनी आपले मत वाया न घालवता विकासाच्या बाजूने निर्णय घ्यावा आणि विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन शेवटी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.
विडणी (प्रतिनिधी) –
ग्रामपंचायत विडणी येथील ७ जागांसाठी मंगळवार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी पोटनिवडणूक होत असून प्रचाराला वेग आला आहे. गावात राजकीय वातावरण तापले आहे. विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी उत्तरेश्वर मंदिर विडणी येथे सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची दिली.
याच पार्श्वभूमीवर लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी ग्रामस्थांना आवाहन करत विडणी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, मागील ३ ते ३.५ वर्षांत गावात विविध विकासकामे सुरू असून ग्रामस्थांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे.
गेल्या अनेक वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नसल्याची टीका करत, सध्याच्या काळात विकासाची गती वाढल्याचा दावा त्यांनी केला. गावाचा सर्वांगीण विकास कायम ठेवण्यासाठी योग्य नेतृत्वाची निवड गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच सध्या ग्रामपंचायत स्तरापासून ते राज्य व केंद्र सरकारपर्यंत सर्व पातळीवर पाठबळ उपलब्ध असल्यामुळे विकासकामांसाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामविकास खात्याचे मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाचा लाभही गावाला होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मतदारांनी आपले मत वाया न घालवता विकासाच्या बाजूने निर्णय घ्यावा आणि विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन शेवटी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले आहे.










