फलटण | प्रतिनिधी
फलटण नगर पालिकेतील अतिशय प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक १० मधून नूतन नगरसेवक म्हणून मोठया मताधिक्याने निवडून आलेले युवानेते अमितशेठ भोईटे यांचा जलमंदिर परिसरातील महिलांनी सत्कार केला. निवडणुकीत मिळालेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत महिलांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
यावेळी बोलताना नगरसेवक अमित भोईटे म्हणाले की, “महिलांचा सन्मान व सहभाग हा समाजाच्या विकासाचा पाया आहे. जलमंदिर परिसरातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व महिला सुरक्षेसाठी प्राधान्याने काम केले जाईल.” महिलांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याचा शब्दही त्यांनी दिला.
या सत्कार प्रसंगी परिसरातील महिला भगिनी, युवक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी आपल्या अपेक्षा मांडत नगरसेवकाकडून विकासकामांची गती वाढविण्याची मागणी केली. कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.











