फलटण प्रतिनिधी : धैर्य टाईम्स
अवघ्या दोन वर्षांत देशातील २८ राज्य आणि २६ हजार सभासद असा अल्पावधीत विस्तार करणाऱ्या "व्हाईस ऑफ मिडीया" पत्रकार संघटना डिजिटल विभागाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी युवा पत्रकार ऋषिकेश आढाव यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जयपाल गायकवाड व सरचिटणीस के.अभिजीत यांनी केली आहे.
देशातील पत्रकार आणि पत्रकारिता यासाठी कृतीशील कार्यक्रम राबविणाऱ्या "व्हाईस ऑफ मिडीया" संघटनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते करण्यात आला होता. पत्रकारांसाठी निवारा, आरोग्य व शिक्षण सुविधा अशा त्रिसुत्री कार्यक्रमाच्या दिशेने या संघटनेने वाटचाल सुरू केली आहे. ऋषिकेश आढाव गेली सात वर्ष वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत आहेत. आढाव यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



















