Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - २६ जून २०२५


 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर फलटण पालिकेकडून रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा अशा सुविधांबाबतीत पूर्वतयारी सुरु असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली.


पालखी सोहळा शनिवारी दि. २८ जून रोजी फलटण मुक्कामी येत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेमार्फत सुरु असलेली आणि झालेली कामे याबाबत मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले, "फलटण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे पालिकेकडून पाठपुरावा करण्यात आला असून वेळोवेळी झालेल्या पावसाच्या अडथळ्यातून पालखी मार्गाची आणि वाहतुकीच्या मार्गाची तात्पुरती डागडुजी पूर्ण होत आलेली आहे.


शहरातील पुलांचे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तुटलेले रेलिंग तातडीने बसवण्यात आले असून नदीपुलावरून चालताना वारकऱ्यांना कोणताही धोका होणार नसल्याची दक्षता घेतली आहे. पालखी मार्गावरील दगड माती उचलण्याचे आणि स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून यासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी शहरातील प्रत्येक प्रमुख चौकात एक पाणपोई ठेवण्यात येणार आहे. वारकऱ्यांचे पाण्याचे टँकर भरण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रावर कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे, याठिकाणी एकाच वेळी ८ पाणी टँकर भरू शकतील अशी व्यवस्था असून १० हजार लिटरचा एक


टैंकर ७ ते ८ मिनिटांमध्ये भरून होईल, असे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी नमूद केले. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी वारकऱ्यांच्या माल वाहतूक ट्रक व अन्य वाहनांसाठी विशेष मार्गाची आखणी केली जात आहे, असेही मोरे यांनी सांगितले.

पालखी तळावर पावसामुळे अडचण निर्माण होऊ नये यासाठी मुख्य रस्ता डांबरीकरण करण्यात आला असून साईडपट्टी मुरुमाने भरण्यात आल्या आहेत. दोन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर तसेच ५०


पालखी तळावर तात्पुरता दवाखाना


यावर्षी प्रथमच जर्मन मंडपाच्या माध्यमातून वारकरी सेवा केंद्र यशवंतराव चव्हाण कॉलेज याठिकाणी उभे करण्यात आले असून १५० डॉक्टरांच्या सहाय्याने या ठिकाणी वारकरी सेवा करण्यात येणार आहे. शासनाच्यावतीने हे केंद्र उभे झाले आहे. याठिकाणी महिला आणि पुरुष वारकरी यांच्यासाठी स्नानगृहाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पालखी तळ तेथे कोणत्याही प्रकारचे हातगाडे, हॉटेल लागणार नाहीत आणि पालखी आगमनाच्या वेळी गर्दी होणार नाही यासाठी नगरपालिकेचे फिरते पथक तैनात असून पोलीस विभागाची मदत यासाठी घेण्यात येत आहे. पालखी तळावर आरोग्य विभागामार्फत छोटे तात्पुरते हॉस्पिटल आणि दवाखाना तयार करण्यात येत असून या ठिकाणी हिरकणी कक्ष आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी २० फिजिओथेरपीचे डॉक्टर्स तैनात असणार आहेत.


कर्मचाऱ्यांच्या मदतीने पालखी तळाची स्वच्छता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पालखी तळावरील विद्युत रोषणाई लाईटसाठी ८ सॅटेलाईट पॉईंट, छोट्या मोठ्या जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी तळावरील दर्शन बारीची व्यवस्था पूर्ण झाली आहे. पालखी तळावर तात्पुरत्या शौचालयाची, स्नानगृहाची सुविधा व त्याठिकाणी लाईटची सुविधा देण्यात येणार आहे, असेही सांगून वारकऱ्यांची फलटण शहरात गैरसोय होणार नाही यासाठी फलटण पालिका सर्वतोपरी खबरदारी घेणार असल्याची ग्वाही निखिल मोरे यांनी दिली. पावसाचा जोर पाहता यावर्षी पालखी तळावर लाल मातीऐवजी कमी जाडीची कच टाकण्यात येणार असून पालखी सोहळा सुखकर होण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER