Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भागवत धर्माचा प्रचार व प्रसारासाठी 21 दिवसांची सायकल वारीचे आयोजन

पंढरपूर ते घुमान (पंजाब ) सायकल वारी
टीम : धैर्य टाईम्स

भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणारे तसेच भागवत धर्माची पताका अटकेपार फडकविणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर २०२२ ते संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा दरम्यान गुरुवार दि. २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) अशी भागवत धर्माची पताका फडकावित तसेच भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी २१ दिवसांची सायकल वारी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे व संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे सचिव डॉ अजय फुटाणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ, संत नामदेव समाजोन्नती परिषद व श्री संत नामदेव समाज युवक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास व माधव महाराज नामदास यांच्या आशीर्वादाने या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र पंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू, नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा २१०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सोबत संत नामदेव महाराज व गुरु गोविंदसिंह यांचा ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका व पालखी रथ असणार आहे. या सायकल वारीत १८ ते ३० वयोगटातील स्त्री,पुरुष सायकल स्वारांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. या सायकलस्वारांचा श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान पर्यंतचा चहा, नाष्टा, जेवण व निवास तसेच सायकलस्वाराची सायकल पंढरपूर पर्यंत गाडीने मोफत आणण्याचा सर्व खर्च संघटने मार्फत केला जाणार आहे. मात्र घुमान ते पंढरपूर पर्यंतचा परतीचा रेल्वेचा प्रवास सायकलस्वाराला स्वतः करावा लागणार आहे.

या सायकल वारीत सहभागी होण्यासाठी सूर्यकांत भिसे ( वेळापूर ) ९८२२०२३५६४ , डॉ अजय फुटाणे ( पुणे ) ९४२२३६२५९५ , शंकर टेमघरे ( पुणे ) , ७९७२८५३८९५ , संजय नेवासकर ( पुणे ) ९८२२२८१५८८ , ॲड विलास काटे ( आळंदी ) , ९८२२८५४९५५ , रोहित यवतकर ( पुणे ) ९९७०००१०१० , सुनिल गुरव ( पंढरपूर ) ९७६७२५७३६७ ,  मांढरे ( सासवड )

9422303343 , सुभाष भांबुरे ( फलटण ) ९८२२४१४०३० , गणेश जामदार ( अकलूज ) ९७६७७९९५९५ , सिध्देश हिरवे ( शिक्रापूर ) ८०८७७६२७८२ व अनंत जवंजाळ ( वेळापूर ) ७४१०११०४०३ यांच्याशी ३० सप्टेंबर २०२२ पुर्वी संपर्क साधून नांव नोंदणी करावी. नाव नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा पोलिस ठाण्याचा वर्तुनुकीचा दाखला, ओळखपत्राची झेरॉक्स , दोन आयडेंटि साईज फोटो, शासकीय किंवा खाजगी रुग्णालयाचे फिटनेस सर्टिफिकेट , कोरोनाचा बुस्टर डोस घेतलेले सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या सायकल वारीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू , श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर , श्री संत सोपानदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र सासवड , श्री संत मुक्ताबाई महाराज संस्थान श्री क्षेत्र कोथळी - मुक्ताईनगर , श्री संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर व श्री संत एकनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र पैठण यांचे सहकार्य लाभणार असल्याचे भिसे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER