Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

कोरोनाच्या संकटात खाद्यतेलाच्या फोडणीला महागाईचा तडका

खाद्यतेलाचे भाव आवाक्याबाहेर : किचन बजेट कोलमडले; महिलांना करावी लागतेय काटकसर
टीम : धैर्य टाईम्स
कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.

रणजित लेंभे

पिंपोडे बुद्रुक : कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. तेलाविना स्वयंपाकच होणार नसल्याने फोडणीला महागाईचा तडका बसला आहे. वाहतूक खर्च वाढल्याचा फटका आणि अपुर्‍या कच्या मालाचा तुटवडा याचा फटका सर्वत्र बसला आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात महागाईच्या झळा सहन करण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे हतबल झालेल्या शहरांतील अनेक कुटुंबांना गावाकडे येऊन राहण्याची वेळ आली आहे. यातून मिळेल ते काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच महागाईचा भडका उडाला आहे. डिसेंबरपासून सिलिंडरच्या दरातही शंभर ते सव्वाशे रुपयांनी वाढ झाली आहे. ग्रामीण भागांतील महिलांवर तर ‘आपली चूलच बरी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. खाद्य तेलाला मात्र पर्याय नाही. स्वयंपाकासाठी खाद्यतेल आवश्यक आहे. 

दसरा व दिवाळीत खाद्यतेलाचा वापर अधिक होत असल्यामुळे त्याचे काही प्रमाणात भाव वाढणे साहजिक होते.पण अपेक्षापेक्षा अधिकच भाव वाढल्याने व्यापारी तर चकित झाले आहेत. याचा सर्वात जास्त त्रास हा सर्वसामान्य कुटुंबांना होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचा बाजारातील उलाढालीवर व भावावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन व भुईमूग पीक हातची गेल्याने त्याचा फटका व परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे. 

दिवाळीच्या दरम्यान 95 ते 98 रुपये असणार्‍या तेलाची किंमत सध्या प्रतिलिटर 135 ते 140 रुपये इतकी झाली आहे. शेंगतेल प्रतिलिटर 180 ते 210 रुपयांपर्यंत गेले आहेत. प्रतिलिटर पामतेल शंभर रुपयाच्या वर आहे. इतर कंपन्यांच्या किमतीत सुद्धा दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य मात्र बेजार झाले आहेत. नेहमीच्या वापरात येणारे तेल आणि कमालीच्या भाववाढीमुळे महिला वर्गांना यापुढे काटकसरी शिवाय पर्याय उरला नाही. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. परिणामी, खाद्य तेलावर आधारित सर्व उत्पादनाच्या किमती वाढल्या, हॉटेल, उपहारगृहातील विविध खाद्यपदार्थ महाग झाले आहेत. सामान्य लोकांची गरज लक्ष्यात घेता, सरकारने खाद्यतेल आयात करावे व तेलाची अधिक किमतीने विक्री करणार्‍याविरुद्ध अन्न व प्रशासन विभागामार्फत गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी व तेलाच्या किमती होण्याविषयी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER