Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी

छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील प्रथम

नगरचा महेश उशीर दुसरा,तर वाठारचा गणेश लोळगे तृतीय धनंजयराव गाडगीळ वाणिज्य कॉलेज सातारा ,फिरत्या चषकाचे मानकरी
टीम : धैर्य टाईम्स

सातारा १ : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग ,वक्तृत्व व वादविवाद मंडळ व दैनिक सकाळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर २०२३ रोजी कर्मवीर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बी.के.बिर्ला कॉलेज मुंबई येथील यश रवींद्र पाटील याने प्रभावी वक्तृत्व करीत प्रथम क्रमांकाचे रुपये पाच हजार ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र हे पारितोषिक मिळविले. तर याच स्पर्धेत द्वितीय , क्रमांकाचे रुपये तीन हजार व सन्मानचिन्ह हे पारितोषिक न्यू आर्टस ,कॉमर्स कॉलेज अहमदनगरचा विद्यार्थी महेश जनार्दन उशीर याने मिळवले. तर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट वाठारचा विद्यार्थी गणेश ज्ञानदेव लोळगे याने रुपये दोन हजार ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र हे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. यावर्षी या स्पर्धेत दहा उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली होती. श्रुती अशोक बोरसे ,एच .पी.टी.कॉलेज नाशिक ,प्रज्ज्वल संजय नरवडे डी.ई.एस नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे ,अथर्व नंदकुमार खरे किसनवीर महाविद्यालय वाई,सुफिया इस्माईल नायकवडी ,व्ही.एन.एम .कॉलेज शिराळा,संतोष सर्जेराव शिंदे एस.पी.एन इंजिनियरिंग कॉलेज हडपसर , संकेत कृष्णात पाटील शिवराज कॉलेज गडहिंग्लज ,शिवम संजय माळकर भारती विद्यापीठ सांगली ,प्रियांका संजय कंठे ,इस्माईलसाहेब मुल्ला लॉं
कॉलेज सातारा,आकांक्षा सहदेव गुरव लॉं कॉलेज सातारा व मोहन साईराज घाटपांडे डी.ई.एस .नवलमल फिरोदिया कॉलेज पुणे या दहा विद्यार्थ्यांना रुपये पाचशे व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील विनायक साळुंखे, ध्रुव पटवर्धन आणि वरद गाडेकर यांनी आपली सांघिक कामगिरी
चांगली करत फिरता चषक जिंकण्याचा मान मिळविला. छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून फलटण येथील मुधोजी कॉलेजचे मराठी विभागातील प्राध्यापक डॉ.अशोक शिंदे ,सुशीलाताई गाढवे महाविद्यालय खंडाळा येथील मराठी विषयाच्या प्राध्यापक डॉ.प्रतिभा पाटणे व महिला कॉलेज कराड येथील प्रा. डॉ.विलास सुर्वे यांनी काम पाहिले. समन्वयक म्हणून डॉ.कांचन नलावडे यांनी काम पाहिले.यावेळी मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,डॉ.विद्या नावडकर,प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे ,प्रा.प्रियांका कुंभार व प्रा. श्रीकांत भोकरे , प्रा. पायल शेळके, प्रा. सोमनाथ कोळी, वेळ नियंत्रक प्रा.सोमनाथ कोळी व
प्रा.ऋषिकेश काळे इत्यादी प्राध्यापक , कमवा आणि शिका योजनेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे उपस्थित होते. सकाळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धा उद्घाटन सत्रात दैनिक सकाळ सातारा येथील सहयोगी संपादक मा. राजेश सोळस्कार यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. त्यांनी मराठी विभागाशी करार करून सकाळ कॉलेज विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी त्यांना व्यासपीठ निर्माण करून देत असल्याचे सांगितले तर विद्यार्थ्यांनी सखोल वाचन करून ज्ञान आत्मसात करून वक्तृत्वाच्या आधारे समाजहिताचे काम करावे असे आवाहन केले. कृतीशील पत्रकारिता ही समाज घडवीत असते.सकाळने यीन,एन.आय.ई.किंवा इंटरनशनल सर्विस सेंटर स्थापन करून समाजाच्या हितासाठी आपली बांधिलकी कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी सकाळ च्या सहयोगाने समाजात मोठी कामे झाल्याचे सांगत सकाळच्या सर्वच संपादकांच्या कार्याबद्दल कौतूक केले. तसेच मा.आर.आर.पाटील यांनी अभ्यास करून प्रभावी वक्तृत्वाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद मिळविल्याचे सांगितले. वक्तृत्व कलेचा विधायक उपयोग करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. या स्पर्धेसाठी,कोपरगाव ,संभाजीनगर,पुणे,मुंबई,कोल्हापूर,सावंतवाडी,अहमदनगर, नाशिक, इत्यादी जिल्ह्यातून ४६ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेसाठी सूत्रसंचालन समीक्षा चव्हाण व सिद्धिका भोसले यांनी केले. प्रास्ताविक डॉ.कांचन नलवडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे यांनी मानले
.कु. जान्हवी चव्हाण ,वर्षा जाधव ,सायली माने ,अनुजा पोरे,विक्रम खरात, ऋत्विक शेलार,अजिंक्य जाधव, ओमकार खंडझोडे इत्यादींनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER