दहिवडी प्रतिनिधी /२ जानेवारी
दहिवडी ( सातारा ) पत्रकार संघाच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यावेळी उमेश बुधावले यांची अध्यक्षपदी तर एकनाथ वाघमोडे यांची उपाध्यक्षपदी व सचिवपदी प्रवीण राजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थापक लालासो दडस होते.
दरवर्षी प्रमाणे दहिवडी पत्रकार संघाची नवीन पदाधिकारी यांच्या निवडी दहिवडी येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आल्या. यावेळी दहिवडी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रुपेश कदम, अभिजीत अवघडे, नवनाथ भिसे, विजय जगदाळे, दौलतराव नाईक, नवनाथ जगदाळे इत्यादी उपस्थित होते.
निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.











