फलटण प्रतिनिधी -
सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा समिती) च्या सदस्यपदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या शिफारशीनुसार दिशा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली असून दिशा समितीचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सदस्य खासदार नितीनकाका पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा सदस्य दिशा समिती व सचिव म्हणून माननीय जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कमिटीचे प्रमुख कामे आहेत. मुख्यता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा कामे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शिक्षण, आरोग्य व विविध योजना राबवणे.
धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांच्या निवडीचे सर्व स्थरातून अभिनंदन होत असून जि. प. सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. विकास कामांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी कमिटी असून त्यांच्या निवडीचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार दीपकराव चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.