धैर्य टाईम्स | 28 एप्रिल 2025
फलटण येथील शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच एकमताने निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर यांची तर उपाध्यक्षपदी सौ.अंजली कुमठेकर, सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे तर खजिनदारपदी सौ. अश्विनी हेंद्रे,सह खजिनदारपदी सौ. रुपाली टाळकुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
येथील शिंपी समाजाच्या विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या हॉल मध्ये महिला मंडळाच्या सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती या बैठकी मध्ये या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवडी करण्यात आल्या आहेत. सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे समाजातील मान्यवर व जेष्ठ व्यक्ती तसेच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




















