फलटण | धैर्य टाईम्स | २८ मे २०२५
असं म्हटलं जाते की, माणुसकी ही रक्तातच असावी लागते त्याचवेळी ती कृतीतून बाहेर येते. आमदार सचिन पाटील यांच्या रक्तातील माणुसकीचे दर्शन काल आसू या ठिकाणी पहावयास मिळाले. त्याचे झाले असे की, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आसू येथील एका कुटुंबाचे अक्षरशः संपूर्ण घरच पाण्यात वाहून गेले होते. पती अंध, तीन लहान मुले, वृद्ध सासू-सासरे व उघड्यावर पडलेला महिलेचा संसार पाहून आमदार सचिन पाटील भावुक झाले. क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक प्रशासनाला त्या महिलेसह कुटुंबाच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश देतानाच त्याची लागलीच अंमलबजावणी आमदार पाटील यांनी केली. तर पावसाने घर वाहून गेलेल्या बेघर झालेल्या त्या महिलेस तात्काळ निवारा उभा करुन देण्याच्या सूचना देऊन तात्काळ कारवाई करण्यात आली. आमदार सचिन पाटील यांच्या या कार्यतत्परतेने तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अतिवृष्टीमुळे फलटण तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेकडो कुटुंबाच्या घरात पावसाचे पाणी शिरून घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान ही मोठया प्रमाणात झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या आमदार सचिन पाटील फलटण तालुक्याच्या विविध गावांना भेटी देऊन अतिवृष्टीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.
काल तालुक्यातील आसू या गावाला भेट दिल्यानंतर त्या गावातील एका महिलेचे छप्पर पाण्याने पूर्णपणे वाहून गेले होते तीन मुले एकटीच महिला अक्षरशः तिचा संसार उघड्यावरच पडला होता. आमदार सचिन पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्या महिलेला अन्नधान्याचे व्यवस्था करून देतानाच तिच्यासाठी नव्याने निवारा उभा करण्याच्या सूचना देऊन त्याच्यावरील तात्काळ कारवाई करण्यात आली. हळव्या मनाचा व माणुसकी जपणारा आमदार सचिन पाटील यांच्या रुपाने फलटणकरांनी पहिला.