फलटण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सकाळी फलटण येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाण दिना निमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, सचिव अरविंद आढाव, फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे, भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे , शहराध्यक्ष अमोल सस्ते, मा. नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, स्वराज पतसंस्थाचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने ज्येष्ठ नेते विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे , मुन्ना शेख,फलटण तालुकाध्यक्ष सतीश अहिवळे,फलटण शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, आर पी आय चे फलटण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, स्वच्छता विभागाचे विनोद जाधव यांच्यासह विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.




















