Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फसवणूक करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
टीम : धैर्य टाईम्स
Fraudulent interstate gang arrested
कुरिअर डिलिव्हरी बॉयची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच आरोपींकडून दोन मोटर कार, एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कराड : कुरिअर डिलिव्हरी बॉयची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच आरोपींकडून दोन मोटर कार, एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अभिजीत नितीन मोहीते, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 4 सप्टेंबर रोजी कराड शहरात एकुण 5 ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवून ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून ॲमेझॉप पार्सल मधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेवून त्याठिकाणी रिन साबण, व्हिल साबण, पार्ले बिस्कीटचे रिकाम्या बॉक्स मध्ये ठेवून एकूण 1 लाख 69 हजार 967 रूपयांची फसवणूक केल्यानूसार गुन्हा दाखल करणेत आलेला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात संशयीत आरोपीना पार्सल मागवण्याकरीता स्वत:चे बोगस पत्ते व बोगस सीमकार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हा उघड करणे व आरोपी पकडणे हे कराड पोलीसांस समोर कडवे आव्हाण होते. तांत्रिक माहितीचा अभ्यास करून प्रथम घडलेला प्रकार हा 1-2 इसमांनी केला नसून त्यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचे आढळून आले. सदर तपासामध्ये विविध तपास कौशल्यांचा वापर करून कराड डीबी पथकाने संशयीत 5 आरोपीत निष्पन्न केले.
अटक आरोपी यांचेकेडे केलेल्या तपासामध्ये आरोपी यांनी गुन्ह्याची कबुली देवून प्रथम गुगल वरून आधारकार्ड डाऊनलोड करून ते मोबाईलवर ईडीट करून प्रथम बोगस आधारकार्ड बनविल्याचे सांगितले. त्यानंतर त्या आधारकार्डांचा वापर करून बोगस सिमकाडेर् खरेदी केली. त्या सीमकार्डांचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ड, रेडमी, विवो स्टोअरवर खाती सुरू करून त्या खात्यांवरून ऑनलाईन ऑर्डर मागवत होते. असा ऑर्डर केलेला मोबाईल मेसेज आल्यानंतर संबंधीत डिलेव्हर बॉयला सुट्टे पैसे मोजण्यास देवून हातचलाखी करून मुळ पार्सलमधील मोबाईल काढून घेवून त्यामध्ये साबणाचा बॉक्स टाकण्यात येत होता. सदरचा साबणाचा बॉक्स टाकत असताना आलेल्या मोबाईल पार्सलचे वजन व बदलून टाकलेल्या साबणाचा बॉक्सचे वजण तंतोतत जुळवले जात होते.
नमुद गुन्ह्यात एकुण 5 निष्पन्न आरेापी यांना बदलापूर, कल्याण जिल्हा ठाणे येथून अटक केलेले आहे. अटक आरोपी यांचेकडून 2 मोटार कार, 1 लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधारकार्ड व फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपी हे त्यांनी बनविलेल्या बोगस आधारकार्डवरच हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी यांचेकडून एकुण 5 लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
आरोपी यांनी या गुन्ह्यासह महाराष्ट्रात पुणे, कल्याण-ठाणे, दादर-मुंबई, नंदुरबार, अलिबाग-रायगड जिल्ह्यात व इतर राज्यात इंदौर-मध्यप्रदेश, भोपाळ-मध्यप्रदेश, कन्नुर-केरळ, गोवा याठिकाणीही असे प्रकार केलेचे कबुली दिलेली आहे. नमुद टोळीतील काही सदस्य उच्चशिक्षित आहेत. ते त्यांना असलेल्या तांत्रिक ज्ञानाच्या वापर करून फसवणूकीचे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद टोळीचे पुढील टार्गेट उरळीकांचन पुणे होते. तेथेही मोबाईलची पार्सल मागविले होते परंतु त्यापुर्वीच कराड पोलीसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. व फसवणूकीचे साहित्य जप्त केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजीत बोऱ्हाडेा, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.श्री. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  बी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहा.पोलीस निरीक्षक अमित बाबर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.
या संशियत आरोपी मध्ये 1) रॉबिन ॲन्थांेनी आरोजा वय 26 वर्षे,मुळ रा. घर नंबर 053 कुचेकल कोचीन राज्य केरळ सध्या रा.गणेशकृपा, प्लॅट नंबर 303,जाधव कॉलनी बदलापूर जि. ठाणे, 2) किरण अमृत बनसोडे वय 24 वर्षे ,रा.चक्कीनाका, गोसावीपुरा, हाजीमलंग रोड, कल्याण पुर्व 3) राहूल मच्छिंद्र राठोड वय 21 वर्षे, रा. गणेशकृपा, प्लॅट नंबर 303, जाधव कॉलनी बदलापूर, 4) रॉकी दिनेश कर्णे वय 21 वर्षे, रा.काकाढाबा गणेश चौक, मलंगबाब रोड कल्याण जि. ठाणे, 5) गणेश ब्रम्हदेव तिवारी वय 39 वर्षे, रा. भटवाडी घाटकोपर मुंबई यांचा समावेश आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि अमित बाबर हे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER