फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रचाराची धडाकेबाज सुरुवात झाली असून मतदारांशी संवाद साधण्यासाठी उद्या शनिवार दिनांक 22 रोजी सकाळी साडेनऊ वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर वहिनीसाहेब यांचा विशेष प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार पेठ परिसरात हा प्रचार कार्यक्रम होणार आहे.
या वेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा विशेष सहभाग राहणार असून प्रभाग २ च्या उमेदवारांमध्ये सौ. मीनाताई जीवन काकडे, सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांची उपस्थिती राहणार आहे.यावेळी माजी नगरसेवक सनी अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
महिला सक्षमीकरण, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, स्वच्छता व स्थानिक विकास या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. प्रचार कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून परिसरात तयारी जोरात सुरू आहेत.
या भेटीमुळे प्रभागातील राजकीय वातावरण अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











