तांत्रिक कामगार युनियनचे फलटण विभागीय सचिव तसेच तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था, साताराचे संचालक शरद मोहन मोरे यांच्या मातोश्री व पिंपरद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माजी संचालिका श्रीमती उल्हासबाई मोहन मोरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर पिंपरद ता. फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बुद्धवासी श्रीमती उल्हासबाई मोहन मोरे यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली, सुना जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
रक्षा विसर्जन व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 8 वाजता पिंपरद ता.फलटण येथे होणार आहे.











