Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

फलटण पालिकेवर भाजपा राष्ट्रवादीची सत्ता

रामराजेंच्या सत्तेचा बुरुंज ढासळला - रणजितसिंह ठरले किंग मेकर
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -

विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे गेली तीस वर्ष निर्विवाद सत्ता असलेली नगरपालिका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अक्षरशः हिसकावून घेत श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव करीत आपले ज्येष्ठ बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा दैदिप्यमान विजय संपादित करीत एक इतिहास रचला असून फलटण नगर पालिकेवर भाजपा राष्ट्रवादीची सत्ता आली आहे तर रामराजेंच्या ३५ वर्षाच्या सत्तेचा बुरुंज ढासळला आहे. 

     

श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांना 15889 अन् विजयी उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना 16489 १६४८९ मते मिळाली असून तब्बल ६०० मतांनी निवडून आले तसेच या ठिकाणी ९१८ मते नोटा ला मिळाली आहेत. दरम्यान २७ नगरसेवक असलेल्या फलटण पालिकेत १८ जागा जिंकल्या असून पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवला तर शिवसेना राजेगटाला फक्त ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय घोषित होताच भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला.

     

फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढत होऊन भाजपाने गेली ३५ वर्षाची श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सत्ता उध्वस्त करीत श्रीमंत रामराजे यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर यांचा माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ चिरंजीव तथा माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ बंधू यांनी समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठ्या मताधिक्याने अनिकेत राजांचा पराभव केला.    

एकदा आमदारकीला आमदार पाडला आणि आता मुलगाच पाडला यामुळे माजी खासदार रणजीत निंबाळकर पुन्हा एकदा फलटणचे किंग मेकर ठरले आहेत. 

    

माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट बरोबर घेत लोकांपर्यंत विकासाचा वादा रणजीत दादा हे दाखवून देत फलटणकरांना विकास पाहिजे आणि तो करायचा असेल तर भाजपाला साथ द्या अशी भावनिक साथ त्यांनी घातली होती यामुळे फलटणकरांनी माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची सत्ता फलटण नगरपालिकेमध्ये निर्विवाद देत तब्बल 18 उमेदवार नगरसेवक पदाचे निवडून आले तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना फक्त आठ जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

     

आजपर्यंत नगरपालिका निवडणुकांमध्ये मलठण नेहमीच माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना साथ देत आले होते परंतु यावेळी फलटण शहरातील इतर सर्वच भागात मुसंडी मारीत मोठ्या मताधिक्याने आपले नगरसेवक निवडून आणले मलठणचा गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती अपवाद वगळता इतर सर्वच ठिकाणी भाजपावर राष्ट्रवादीने मोठ्या मताधिक्याने नगरसेवक निवडून आणले मलठण मध्ये भाजपाचे गटनेते अशोकराव जाधव यांचा माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी धक्कादायक असा पराभव केला. तसेच मलठण मध्ये किरण राऊत यांचा दीपक कुंभार यांचे विरुद्ध फक्त दोन मताने विजय झाला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज पवार यांनी भाजपाचे अमोल भोईटे यांचा फक्त वीस मतांनी धक्कादायक असा पराभव केला आहे. 

    

प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपा पुरस्कृत मैत्रीपूर्ण लढत झाली होती तसेच येथे शिवसेनेने तिसरा पर्याय दिला होता मात्र माजी नगराध्यक्ष सोमाशेठ जाधव यांनी आपल्यासह सोबतच्या उमेदवार अस्मिता ताई लोंढे यांना मोठ्या संख्येने निवडून आणले यामुळे या ठिकाणी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष पदासाठी चांगली मते मिळाली. 

  प्रभाग क्रमांक दोन मध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाने सुपर्णा ताई सनी अहिवळे अन मीना जीवन काकडे या दोघींनी समोरच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने पराभव केला या ठिकाणी मात्र राजे गट तथा शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसला असून अपक्ष उमेदवार सोनाली संग्राम अहिवळे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मागे टाकून अपक्ष दोन नंबरला राहिल्या या ठिकाणी बंडखोरी झाली नसती तर वेगळा निकाल निश्चित पाहायला मिळाला असता, प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा आणि शिवसेनेमध्ये थेट लढत झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादित केला त्याचबरोबर सोबतच्या भाजपाच्या उमेदवार सुलक्षणा सरगर याही निवडून आल्या आहेत.

    

प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपा व राष्ट्रवादीला शिवसेनेने मोठ्या मताधिक्याने चितपट करीत भाजपा व राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवारांचा पराभव केला यामधून पप्पू शेख व रूपालीताई सुरज जाधव यांनी शिवसेनेचा झेंडा फडकवला, प्रभाग क्रमांक पाच मध्ये माजी नगरसेवक दत्तराज हटकर यांच्या पत्नी कांचनताई दत्तराज व्हटकर यांनी विजय संपादित केला त्याचबरोबर भाजपाचे रोहित राजेंद्र नागटिळे हेही निवडून आले प्रभाग क्रमांक सहा मध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या चुलती माजी नगरसेविका मंगलाताई नाईक निंबाळकर या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या मात्र या ठिकाणी भाजपाचे किरण राऊत हे फक्त दोन मतांनी निवडून आले या ठिकाणी शिवसेनेचे दीपक कुंभार यांचा धक्कादायक पराभव झाला, प्रभाग क्रमांक सात मध्ये माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी भाजपाचे गटनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव करीत मलठण मध्ये भाजपाचा गड आला परंतु सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली, या ठिकाणी भाजपाच्या स्वातीताई राजेंद्र भोसले यांनी विजयी संपादित केला यामुळे मलठण मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

    

प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वात तरुण उमेदवार यांनी माजी नगरसेविका सुवर्णाताई खानविलकर यांचा पराभव केला तसेच या ठिकाणी नवखे उमेदवार विशाल तेली यांनी माजी नगरसेवक फिरोज आतार यांचा धक्कादायक पराभव करीत या ठिकाणी एक शिवसेना अनेक भाजपा असा दोन उमेदवार निवडून आले. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष पंकज पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल भोईटे यांचा फक्त वीस मतांनी पराभव केला तसेच कविताताई मदने यांनी रजिया मेटकरी यांचा पराभव केला या मध्ये शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांनी राष्ट्रवादीचा पराभव केला. 

    

प्रभाग क्रमांक दहा मध्ये माजी नगराध्यक्ष नंदकुमार आबाजी भोईटे यांचे पुतणे अमित शेठ भोईटे यांनी गणेश शिरतोडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला तसेच कुमारी श्वेता किशोर ताराळकर यांनी भाजपाचे युवा नेते बबलू शेठ मोमीन यांच्या मातोश्रींचा पराभव करीत इतिहास घडविला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांचा संदीप चोरमले यांनी मोठ्या फरकाने पराभव करीत इतिहास रचला, याच ठिकाणी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या स्नुषा प्रियदर्शनी रणजीतसिंह भोसले उर्फ दीदी यांनी प्रियांका युवराज निकम यांचा धक्कादायक असा पराभव केला आहे. 

    

प्रभाग क्रमांक बारा मध्ये शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी भाजपाच्या दोन्ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करीत या ठिकाणी इतिहासात नोंद होईल असा पराभव करून विकास काकडे सर व स्मिता संगम शहा यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण निवडून आणीत भाजपाला दे धक्का दिला. प्रभाग क्रमांक 13 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉक्टर सचिन सूर्यवंशी बेडके यांचा राहुल भैया निंबाळकर यांनी धक्कादायक पराभव करीत इतिहास रचला त्याचबरोबर दुसऱ्या उमेदवार रूपालीताई अमोल सस्ते यांनी तसेच मोहिनी मंगेश हेंद्रे यांनी भाजपाचे कमळ फुलवीत राजे गटाच्या बालेकिल्ल्यात श्रीमंतांना मोठी चपराक देत विजय संपादित करून राजे गटाला मोठा धक्का दिला आहे. 

     

फलटण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठा गट,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अपक्षांचा अन् राष्ट्रीय काँग्रेस चा कुठेही प्रभाव पडला नाही त्या सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.


 राजेगटाची म्हणजे ज्या प्रभागातून नगरपालिका निवडणुकीमध्ये एन्ट्री झाली होती त्या प्रभागात एकही उमेदवार निवडून आला नाही.


आजचे विजयी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी स्व.माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर(नेते) पाहिजे होते.....


प्रभाग क्रमांक ६ मध्ये फक्त दोन मतांनी निवडून येत किरण राऊत यांनी दीपक कुंभार यांचा पराभव केला.


 प्रभाग क्रमांक, ९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार पंकज पवार यांनी अमोल भोईटे यांचा फक्त वीस मतांनी धक्कादायक पराभव केला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER