Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

टीम : धैर्य टाईम्स

मुंबई दि. २८: उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींना देखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन केले.  
महिलांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.

फिरता निधी दुप्पट

आपल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहाय्यता गटांना प्रती गट रु 15 हजार फ़िरता निधी देण्यात येतो. त्यामध्ये वाढ करुन प्रती समुह रु 30 हजार फ़िरता निधी देण्यात येईल. या वाढीमुळे अतिरिक्त रु 913 कोटी एवढ्या निधीची तरतुद राज्य शासनामार्फ़त करण्यात येणार आहे.

मानधनात दुपटीने वाढ

स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा रु ३ हजार  एवढे मानधन अदा करण्यात येते.  बचत गट चळवळीतील त्यांचे योगदान व  मागणी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात  वाढ करून ते  प्रति महा ६ हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे. या करिता १६३  कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतुद  करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.  या  अभियानात राज्यस्तरापासून ते क्लस्टर स्तरापर्यत स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत अभियानांतर्गत एकूण २७४१ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या मासिक मानधनामध्ये २० टक्के वाढ करण्यात येणार आहे तसेच  त्यांच्या इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वयं सहाय्यता गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे मूल्यवर्धन करणे ,गुणवत्तेत वाढ करणे , आधुनिक पॅकेजिंग व ब्रॅन्डींग करिता प्रोत्साहन देणे व उत्पादनांना हक्काची बाजारेपठ मिळवून देणे इत्यादी उपक्रम राबवून  ग्रामीण महिलांचे सर्वार्थाने सक्षमीकरण करण्यासाठी शासन भविष्यात देखील कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश देखील महिला स्वयं सहायता गटांमार्फत देण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

बँक कर्जाची नियमित परतफेड
 
मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, उमेद अभियानांतर्गत आतापर्यत सुमारे ६ लाख स्वयं सहाय्यता समूह स्थापित करण्यात आले  असून यामध्ये  ६० लाखांपेक्षा  अधिक  महिलांचा  समावेश आहे. तसेच ३० हजार ८५४ ग्रामसंघ व १ हजार ७८८ प्रभागसंघ आहेत. या महिलांना उत्पन्न मिळावे म्हणून  उमेद अभियान तसेच बॅकामार्फ़त अर्थसहाय्य देण्यात येते. स्वयं सहाय्यता गट स्थापन झाल्यानंतर ३ महिन्यानंतर त्यांना अंतर्गत कर्ज व्यवहाराला अर्थसहाय्य म्हणून रु.१० हजार ते रु १५ हजार याप्रमाणे फिरता निधी वितरीत करण्यात येतो.

 आतापर्यत ३ लाख ९१ हजार ४७६ गटांना  रु. ५८४ कोटीचा फिरता निधी देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ८० हजार ३४८ समूहांना रु.५७७ कोटीचा समुदाय गुंतवणूक निधी देण्यात आला आहे.

आतापर्यत बॅकामार्फ़त राज्यातील ४.७५ लाख स्वयं सहाय्यता गटांना रु. १९ हजार ७७१  कोटीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये  २०२२-२३ या एकाच वर्षात २ लाख ३८ हजार ३६८ स्वयं सहाय्यता गटांना तब्बल रु. ५ हजार ८६० कोटीचे बँक कर्ज देण्यात आले आहे.

 अभियानाअंतर्गत ९६% बँक कर्जाची परतफेड वेळेवर होत असून सध्यस्थितीत NPA चे प्रमाण फ़क्त ४.३१% आहे त्यामुळे स्वयं सहाय्यता समूहांना कर्ज देण्यामध्ये बँका पुढे येत असून या गटातील महिलांना पतपुरवठा करण्यासाठी बॅका  मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER