मुंबई - 12 फेब्रुवारी 2025

विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुबंई मंत्रालयात भेट घेतली. या भेटीचा अधिक तपशील मिळू शकला नाही, मात्र राजकीय वर्तुळात तर्क - वितर्क सुरू झाले आहेत.
आमदार रामराजे आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी मुंबई मंत्रालय येथे दाखल झाले होते. काही दिवसापूर्वीच रामराजे यांची चुलत बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या गोविंद डेअरी संबंधित आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.












