Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या ई. महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र परवाने रद्द करून शेतकऱ्यांचे पैसे परत करावे

तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी - स्वाभिमानी शेतकरी संघटना
टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 

फार्मर आयडीसाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या ई. महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र परवाने रद्द करून शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावे व या प्रकरणी तहसीलदार अभिजित जाधव यांची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याबाबतचे तक्रार अर्ज स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिला आहे.

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिलेल्या तक्रार अर्जात असे म्हंटले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा व फलटण तालुका यांनी तक्रार अर्ज दाखल करत असून आपण याप्रकरणी जबाबदार अधिकारी या नात्याने खालील मुद्द्यान्वये ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व तहसीलदार अभिजित जाधव यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना योजना मिळाव्या म्हणून फार्मर आयडी काढा असे सांगितले होते. शासनाने ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पैसे देत असताना फलटण तालुक्यातील ई. महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र मालकांनी मोफत योजना असताना फार्मर आयडी करीता शेतकऱ्यांकडून 100,200,300 असे पैसे घेऊन आयडी काढायला सूरवात केली आहे. केंद्र मालक पैसे घेत असल्याने आयडी काढण्याचे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या याबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या असून आत्तापर्यंत अंदाजे 20 हजार आयडी काढले असून फार्मर आयडी काढणे मोफत असताना शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे का घेतले याबाबत ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र मालक यांना विचारले असता त्यांनी आम्हाला तहसीलदार अभिजित जाधव यांनी मीटिंग मध्ये पैसे घ्यायला सांगितले आहेत असे सांगितले. 

तहसीलदार अभिजित जाधव यांनी केंद्र चालक यांना 20 ते 30 रुपये एका फार्मर आयडी काढायला घ्या असे सांगितले असून शासनाकडून फार्मर आयडी काढल्यास पैसे केंद्र चालक यांना मिळत असताना 20 ते 30 रुपये कशासाठी घ्यायला लावले कोणत्या आदेशाने व नियमाने घ्यायला लावले. तहसीलदारांनी पैसे घ्यायला सांगितले म्हणून केंद्र चालक यांनी शेतकऱ्यांकडून 100,200,300 असे पैसे घेऊन आय डी काढले आहेत. केंद्रांनी लाखो रुपये लाटले आहेत पैसे घेलेल्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ परत करावेत व या प्रकरणाची चौकशी करावी पैसे घेतलेल्या सर्व केंद्रांचे परवाने रद्द करावेत.

 तहसीलदार अभिजित जाधव यांना शासनाने दिलेले आदेश न पाळता जाणीवपूर्वक आर्थिक हेतूपोटी परस्पर पैसे घेण्यास सांगितल्याचे पुरावे आम्हाला सापडले असून ते आम्ही चौकशी कामी चौकशी अधिकारी यांच्याकडे दाखल करु तालुक्यात मनमानी कारभार करत बेकायदेशीर फार्मर आयडी काढायला पैसे घ्यायला सांगणाऱ्या तहसीलदार अभिजित जाधव यांच्यावर त्यांना दिलेले नेमून दिलेले काम पार न पडता चुकीचे काम केल्याबाबत तत्काळ खातेनिहाय चौकशी करण्यात यावी खातेनिहाय चौकशीत आम्हालाही साक्षीदार म्हणून दाखल करण्यात यावे या प्रकरणाची चौकशी लवकर करण्यात यावी.

याप्रकरणी तहसीलदार अभिजित जाधव व सर्व फलटण तहसील कार्यालय अंतर्गत येणारी ई.महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांचा चौकशी अहवाल प्रसिद्ध करावा शेतकऱ्यांतून घेतलेले पैसे तत्काळ परत करावेत. सविस्तर चौकशी करून दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. तत्काळ याप्रकरणी दखल न घेतल्यास संबंधित वरिष्ठ अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल व त्याप्रकरणी स्वतंत्र तक्रार दाखल करायला भाग पाडू नये.स्वाभिमानी शेतकरी संघटना याविषयी आंदोलन करणार आहे शेतकऱ्यांची झालेली आर्थिक लूट प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करून दोषींवर कारवाईची मोहीम हाती घेण्यार आहे. असे तक्रारी अर्जात नमूद केले आहे. सदरची तक्रार उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आली यावेळी संग्रामसिंह उर्फ धनंजय संपतराव महामुलकर जिल्हाध्यक्ष सातारा स्वाभिमानी शेतकरी संघटन,नितीन यादव अध्यक्ष फलटण तालुका, प्रमोद गाडे राज्य प्रवक्ते ,रवींद्र घाडगे, बाळासाहेब शिपुकले, प्रल्हाद अहिवळे,किसन शिंदे ,किरण भोसले साखरवाडी विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER