Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

श्रीराम जवाहर साखर कारखाना फलटणच्या बेकायदेशीर वसुलीने वाहतूकदार देशोधडीला

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी :- श्रीराम जवाहर साखर कारखाना प्रशासनाकडून ऊस हंगामाकरीता ऊस वाहतूकदार यांना दिलेल्या रक्कम वसुलीसाठी ऊस वाहतूकदार यास सोडून जमीनदार ऊस वाहतूकदार यांच्या वाहतूक बिलातून बेकायदेशीर वसुली करत असल्याने वाहतूकदार यांच्यात नाराजी निर्माण झाली असून पुढील हंगामाकरीता श्रीराम जवाहर साखर कारखाना फलटण यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या मूळ वाहतूकदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल न करता उचल दिलेल्या रकमेची कोरे चेक घेऊनही वसुली न करता ऊस वाहतूकदार याच्या कडून कोणत्याही प्रकारची आगाऊ नोटीस न देता जामीनदार वाहतूकदार यांच्या बिलातून पैशाच्या वसुलीसाठी शेतकी अधिकारी प्रल्हाद लावंड हे सक्ती करून बेकायदेशीर वसुली करत आहेत.

श्रीराम जवाहर साखर कारखाना प्रशासनाकडून मागील वर्षी कारखान्याला ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रेलर एका टोळीला किमान 5 लाख रुपये दिले होते. त्यासाठी संबंधित कारखाना यांनी ऊस वाहतूकदार यांना बँकेकडून कर्ज काढून रक्कम दिली जाते या कर्जाला संबंधित कारखाना जामीन असतो. ही रक्कम दिल्यानंतर संबंधित मुकादम व ऊस वाहतूकदार यांच्यात करार होतो. त्यात किती लोक पाठवणार, त्यासाठी किती रक्कम मिळणार, याचा उल्लेख असतो. कारखान्यांकडून प्रती तोडणी टन व प्रति वाहतूक टन रक्कम ठरवून वाहतूकदाराला पैसे दिले जातात, त्यातून वाहतूकदार बँकेच्या कर्जाची रक्कम परत करत असतो. असा हा व्यवहार आहे.

अलीकडे उसाचे वाढलेले क्षेत्र, त्याचबरोबर साखर कारखान्यांची वाढलेली संख्या आणि त्या तुलनेत कमी झालेले ऊस तोडणी मजूर याचा गैरफायदा घेऊन काही मुकादमांनी ऊस वाहतूकदारांना गंडा घातला आहे. करार सर्वांसोबत करायचे, सर्वांकडून डिपॉझिट रक्कम घ्यायची आणि मजूर मात्र तिसरीकडेच पाठवायचे, असे प्रकार गेल्या दोन वर्षांत वाढले आहेत. 

मुकादम व वाहतूकदार यांच्यातील कराराला कायदेशीर आधार नाही तसाच वाहतूक व कारखाना यांच्यातील कराराला कायदेशीर आधार नाही मूळ वाहतूकदार यांच्याकडून वसुली न करता जमीन झालेल्या वाहतूकदार यांच्या बँकेत जमा होणाऱ्या तोडणी वाहतूक बिलातून पैशाच्या वसुलीसाठी शेतकी अधिकारी प्रल्हाद लावंड हे अरेरावीची भाषा करत बेकायदेशीरित्या रक्कम वसुली करत असल्याने दुसऱ्या वाहतूकदारांची उचल भरण्यासाठी वाहने विकून रक्कम भरण्याची वेळ काही वाहतूकदार यांच्यावर आली आहे. मूळ वाहतूकदार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल न करता, सुरक्षा चेक ने वसुली न करता आगाऊ सूचना व नोटीस न देता बिल रकमेतून केली जाणारी वसुलीस वाहतूकदार यांनी विरोध केला आहे.

श्रीराम जवाहर साखर कारखाना शेतकी अधिकारी प्रल्हाद लावंड यांच्या मनमानी, हुकूमशाही, अरेरावीची मुळे पुढील हंगमातील वाहतूक परिस्थिती गंभीर बनणार असून अनेक ऊस वाहतूकदार यांनी श्रीराम जवाहर साखर कारखाना यांच्याकडे ऊस वाहतूक करार न करण्याचा निर्णय घेतला आहे.श्रीराम जवाहर साखर कारखाना शेतकी अधिकारी प्रल्हाद लावंड हे स्वतःच आम्ही बेकायदेशररित्या वसुली करत असल्याचे मान्य करत असल्याने शेतकी अधिकारी यांच्यावर श्रीराम जवाहर साखर कारखाना तसेच साखर आयुक्त कोणती कारवाई करणार याकडे वाहतूकदार यांचे लक्ष लागले आहे.

फलटण तालुक्यातील अनेक ऊस कारखान्यात तसेच शेजारील तालुक्यातील ऊस कारखान्यात पराक्रम गाजवून आलेल्या "त्या" शेतकी अधिकाऱ्याची उचल बांगडी करण्याची मागणी ऊस वाहतूकदार यांनी केली असून स्वतःला कारखान्याचे मालक समजणाऱ्या "त्या" शेतकी अधिकाऱ्याला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER