Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

नवी मुंबई येथील माहिती भवन ला बाळशास्त्री जांभेकरांचे नाव द्यावे : रविंद्र बेडकिहाळ

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
टीम : धैर्य टाईम्स
माहिती भवनला मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

फलटण, दि.27 : नवी मुंबईतील नेरुळ येथे राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकारातून प्रसारमाध्यमांसाठी सुरु होणार्‍या माहिती भवनला मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यानुसार सदर ठिकाणी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु करण्यात येणार आहे. याला अनुसरुन सदरची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

या ‘माहिती भवन’ च्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालन उभे राहत असल्याबद्दल शासनास धन्यवाद देवून सदर निवेदनात नमूद करण्यात आले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून मराठी व इंग्रजी अशा संमिश्र भाषेतल्या पहिल्या ‘मुंबई दर्पण’ या मराठी वृत्तपत्राची सुरुवात दि.6 जानेवारी 1832 रोजी केली. तसेच ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी भाषेतील मासिकाचीही सुरुवात त्यांनीच मुंबईतून दि.1 मे 1840 रोजी केली. तसेच सन 1812 ते 1846 या काळात शिक्षण, संशोधन, समाजप्रबोधन आदींच्या माध्यमातून त्यांचे मुंबईतून महाराष्ट्रासाठी, देशासाठी प्रचंड योगदान आहे. परंतु या एव्हढ्या कर्तृत्त्ववान महापुरुषाचे मुंबई महानगरीत अद्यापपर्यंत काहीही स्मारक नाही. तथापि, मुंबई या बाळशास्त्री जांभेकरांच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक व्हावे यासाठी राज्यशासनाच्या या माहिती भवनचे ‘‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर माहिती भवन’ असे नामविस्तारीकरण तातडीने करावे.

तसेच सदर भवनमध्ये दर्शनी भागात बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धपुतळा किंवा लाईफ साईज पोट्रेट व त्याच्या एका बाजूला ‘दर्पण’ या पहिल्या वृत्तपत्राचे व दुसर्‍या बाजुला ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी मासिकाचे मुखपृष्ठ व पहिल्या अंकाचे डिजीटल पद्धतीने छायाचित्र लावण्यात यावे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या चरित्र कार्यावर आधारित माहितीपट, मराठी वृत्तपत्रसृष्टीवर आधारित लघुपट तयार करुन त्याचे प्रदर्शन मोठ्या स्क्रिनवर करण्यासाठी किमान 100 आसनाचे सुसज्ज सभागृह बांधण्यात यावे. या सभागृहाच्या आतील भिंतीवर मराठी वृत्तपत्रसृष्टीतील ख्यातनाम प्रसिद्ध अशा प्रभावशाली संपादकांची तैलचित्रे लावण्यात यावीत. राज्यातील मराठी वृत्तपत्रांचे जिल्हानिहाय प्रदर्शनही याठिकाणी डिजिटल पद्धतीने संकलित करण्यात यावेत. येथील भव्य अशा ग्रंथालयात ख्यातनाम संपादकांची चरित्रे, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील प्रसारमाध्यम, आधुनिक तंत्रज्ञान, माहिती यावरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय लेखकांचे / ग्रंथकारांचे संदर्भ ग्रंथ इत्यादींचा समावेश व संदर्भ अभ्यासासाठी आधुनिक पद्धतीची अभ्यासिका असावी, अशी अपेक्षाही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर निवेदनाची प्रत माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री ना.अदिती तटकरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना पाठवण्यात आली असून बाळशास्त्रींच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेवून शासनाने राज्यातील पत्रकारांच्यावतीने करण्यात आलेली संस्थेची ही प्रातिनिधीक मागणी तातडीने मान्य करावी, असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, बापूसाहेब जाधव, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER