Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

माहेश्वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्टच्या अन्नदान सेवा उपक्रमाचे पुनश्‍च: हरीओम

टीम : धैर्य टाईम्स
Re-launch of Maheshwari Charitable Foundation Trust's Food Donation Services Initiative
माहेश्‍वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून सुरु असलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे सातारा सिव्हल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकां करीता वर्षातील 365 दिवस सुरु असणारा अन्नदान महायज्ञ. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित असलेला या उपक्रमाची दि. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरुवात झाली आहे.

सातारा : सातारा शहरामध्ये माहेश्‍वरी चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायीत्वाच्या भावनेतून सुरु असलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे सातारा सिव्हल हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकां करीता वर्षातील 365 दिवस सुरु असणारा अन्नदान महायज्ञ. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित असलेला या उपक्रमाची दि. 1 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरुवात झाली आहे. या उपक्रमाद्वारे रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय होत असल्याने त्यांना आपल्या व्याधीग्रस्त आप्तेष्टांच्या देखभाली करीता अधिक लक्ष पूरवता येते व त्यांच्या विवंचनेचा भार देखील काही प्रमाणात हलका होण्यास मदत होते.
गेले एक तप म्हणजेच 12 वर्ष हा उपक्रम माहेश्‍वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्ट, सातारा च्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सहकार्यातून यशस्वीरित्या राबला जात होता. पण अनपेक्षितरित्या उद्भवलेल्या व संपर्ण जगाला ग्रासलेल्या कोरोना महामारीचे सावट या अन्नदान महायज्ञाच्या उपक्रमावर देखील पडले. व या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये हा अखंड सुरु असलेला उपक्रम नाईलाजाने थांबवावा लागला. पण सध्या या परिस्थिीमधून आपण सर्वजणच हळू हळू सावरत असताना या उपक्रमाचे प्रमुख माधव सारडा जे स्वत: दररोज जिल्हा रुग्णालयातील या उपक्रमाध्ये लक्ष देऊन निटनेटके व्यवस्थापन करतात. सर्वांशी योग्य समन्वय राखत या उपक्रमाची जबादारी पारपाडत असतात, त्यांनी पुन्हा नव्या जोमाने या अन्नदान महायज्ञाचा सर्वांच्या सहकार्याने पुनश्‍च: हरीओम करण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात दि. १ नोव्हेंबर रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष कदम, मेट्रन चव्हाण मॅडम, प्रथम दिवसाचे अन्नदाते मा. आसिफ खान (मिस्त्री ) श्री राधेश्याम भंडारी, संदिप भट्टड, माननीय वासिम खान, जयश्री शेलार व उपक्रम प्रमुख माधव सारडा उपस्थित होते.
कोणतेही मोठे समाजोपयोगी कार्य जर सातत्याने सुरु ठेवायचे असेल तर त्यामध्ये समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाखमोलाचा असतो. सर्वांच्या यथाशक्ती योगदानाने मग हा उपक्रम केवळ एका संस्थे पूरता मर्यादित न राहता, त्याला व्यापक सामजिक स्वरुप येते. म्हणूनच माहेश्‍वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्ट तर्फे सर्व सातारकर नागरीक, संस्था, व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की, या अन्नदान महायज्ञामध्ये आपण अधिकाधिक सहभाग नोंदवावा. कारण आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले आहे. अन्नसेवा म्हणजे साक्षात नारायणसेवाच समजली जाते. कारण भूकेल्यासाठी अन्नाचे मोल हे शब्दातीत आहे. आपल्या या उपक्रमातील सहभागामूळे शासकिय रुग्णालयात दाखल कित्येक रुग्णांच्या नातेवाईकांना कठीण काळामध्ये दिलासा देण्याचे कार्य आपल्या हातून घडणार आहे. तरी आपण आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, शुभ प्रसंगाच्या निमित्ताने किंवा आपल्या आदणिय व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त या अन्न सेवेमध्ये आपले यथोचित योगदान देऊ शकता. सामाजिक जाणिवेचे भान समस्त शाहूवासियांना खूप चांगल्या प्रकारे असल्याने सर्वांच्या सहकार्याने माहेश्‍वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्टने गेली 12 वर्षे हा उपक्रम यशस्वी पार पाडला आहे. तरी पुन्हा एकदा समस्त सातारक शहरवासीयांनी या उपक्रमात मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले. ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी माधव सारडा, अन्नसेवा उपक्रम प्रमुख - फोन : 9822078768 यांच्याशी तसेच अध्यक्ष व संपूर्ण ट्रस्टी मंडळ, माहेश्‍वरी चॅरीटेबल फाऊंडेशन ट्रस्ट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER