फलटण धैर्य टाईम्स
फलटण शहर आणि उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे पाऊस आहे. विशेषतः कोळकी आणि जाधववाडी या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी अडीजच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. गेली चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर केवळ ढगाळ वातावरण असेल तर मात्र दमट हवामान निर्माण होत असल्याने अंगातून घामाच्या धारा निघत असल्याचे फलटणकर सांगतात.