Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

अतिवृष्टी नुकसान भरपाई व संपूर्ण कर्जमाफी कधी मिळणार : आ. दिपकराव चव्हाण

अधिवेशन संपताच बैठक घेऊन संपूर्ण रक्कम देणार : ना. शंभूराज देसाई
टीम : धैर्य टाईम्स

सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

फलटण, दि. २७ : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांच्या संपूर्ण नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही, ती कधी देणार, अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या परंतू नुकसान झाले त्यांना मदत करणार अशी घोषणा प्रत्यक्षात कधी येणार आणि कर्जमाफी उर्वरित रक्कम कधी मिळणार असे सवाल आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे विचारले आहेत. 

  नागपूर हिवाळी अधिवेशनात आज मंगळवार दि. २७ रोजी सकाळच्या सत्रात आ. दिपक चव्हाण यांनी लक्षवेधी द्वारे सदर प्रश्न सभागृहात उपस्थित केले. तालीका सभापती आ. संजय शिरसाठ त्यावेळी सभापतींच्या आसनावर होते.

 जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्यात संततधार अतिवृष्टी झाली, त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील ६ ते ७ तालुके अतिवृष्टीने बाधीत झाले. दुबार पेरणी करुन सुद्धा घेवडा, बटाटा, कांदा व सोयाबीन यांसह भाजीपाला आदी हाताशी आलेली पीके वाया गेली. यामुळे शेतकरी काकुळतीला आला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नुकसान ग्रस्त भागाचे दौरे करुन मदतीचे आश्वासन दिले मात्र सातारा जिल्ह्यात अद्याप सदर नुकसान भरपाई पूर्ण स्वरुपात मिळाली नसल्याचे आ. दिपक चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

 सातारा जिल्ह्यात ३४५०१ शेतकऱ्यांची १० हजार हेक्टर क्षेत्रातील पिके अतिवृष्टीने वाया गेली त्यामध्ये सुमारे २२ कोटी रुपयांचे नुकसान झाले, आतापर्यंत ५ कोटी रुपये देण्यात आले, मात्र उर्वरित १७ कोटी अद्याप न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे नमूद करीत सदर रक्कम कधी मिळणार असा सवाल आ. दिपक चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला.

अतिवृष्टी नुकसान भरपाई देताना निकषात न बसणाऱ्या परंतू ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टीग्रस्त भगाचा दौरा करताना दिले मात्र प्रत्यक्षात नावे जाहीर होताना त्यामध्ये सातारा जिल्ह्याचा उल्लेख नसल्याने सातारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही असा सवाल जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर सर्व बाधीतांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासनाच्या वतीने दिल्याचे निदर्शनास आणून देत मात्र त्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

सातारा जिल्ह्यात ७५० कोटी कर्ज माफी मिळणार होती, मात्र प्रत्यक्षात केवळ २५० कोटी मिळाले, दुसऱ्या टप्प्यातील यादी आजच प्राप्त झाली असून त्यामध्ये ३०० कोटी रुपये प्राप्त होतील उर्वरित २०० कोटींचे काय असा सवालही आ. दिपक चव्हाण यांनी उपस्थित केला.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिवेशन संपल्यावर तातडीने बैठक घेऊन प्रलंबीत निधी वितरित केला जाईल असे आश्वासन सभागृहास दिले.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेल्या घोषणांची पूर्तता करतात किंबहुना जे करणार त्याच घोषणा करतात याची ग्वाही देत पूर्वी २ हेक्टर असलेली मर्यादा ३ हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आणि एन. डी. आर. एफ. च्या निकषाच्या दुप्पट रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून नियमीत कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष अनुदानाची घोषणा सतत २ वर्षे करण्यात आली मात्र प्रत्यक्षात ते अनुदान आमच्या शासनाने या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे ही यावेळी पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER