फलटण | प्रतिनिधी
कोळकी ता. फलटण येथे विशाल पाटील यांच्या निवासस्थानी प्रभाग क्रमांक १, २ व ३ मधील नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार समारंभ पाटील परिवार व मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व बुद्धपूजा करून करण्यात आली.
या सत्कार समारंभात प्रभाग क्रमांक १ च्या अपक्ष नगरसेविका अस्मिता लोंढे, प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेविका मीनाताई जीवन काकडे, सुपर्णा सनी अहिवळे, प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेवक सचिन रमेश अहिवळे यांचा सन्मान करण्यात आला.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा डॉकटर सेलचे शहराध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे, सुनील अहिवळे, बबलू भैया मोमिन,प्रशांत काकडे (आप्पा), आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर युवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता भोसले यांनी केली तर आभार विशाल पाटील यांनी मानले.











