धैर्य टाईम्स च्या १२ व्या वर्धापन दिना निमित्त फलटण येथे बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते धैर्य टाईम्सच्या नव्या वेबसाईटचा शुभारंभ
फलटण : प्रतिनिधी
अतिशय खडतर परिश्रम, सत्याची कास, पत्रकारितेचे मापदंड, सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण ठेवत धैर्य टाइम्स ने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले, ते धैर्य टाईम्स च्या १२ व्या वर्धापन दिना निमित्त फलटण येथे बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते धैर्य टाईम्सच्या नव्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला.
वेबसाईट शुभारंभ प्रसंगी धैर्य टाईम्स चे संस्थापक संपादक सचिन मोरे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, विदयुत क्षेत्र तांत्रिक कामगार पतसंस्था चे संचालक शरद मोरे, आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक संजय मोहिते, लतीफभाई तांबोळी, मनोज कांबळे, एकता दर्शन चे संपादक ह्रिषीकेश आढाव, आदी मान्यवर उपास्थित होते. धैर्य टाईम्स च्या विविध क्षेत्रातील कामाचा आढावा घेताना खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी धैर्य टाईम्स ला कायमच पाठींबा राहील असे अभिवचन दिले.











