Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

विधीमंडळ अधिवेशनात संपादक व पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करु : आ.दीपक चव्हाण

टीम : धैर्य टाईम्स

फलटण : आज प्रसारमाध्यमांमध्ये नव्याने कितीही आधुनिक प्रकार आले तरी वृत्तपत्रे हीच पत्रकारितेचा पाया असल्याने त्यांची विश्‍वासार्हता सर्वाधिक आहे. वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार व ज्येष्ठ सेवानिवृत्त पत्रकार यांचे प्रश्‍न गंभीर असून विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्यात समन्वय साधून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात हे प्रश्‍न सोडवण्याचा आपण निश्‍चित प्रयत्न करु, असे अभिवचन फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिले. 

येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्रातील वृत्तपत्र संपादकांची शासनमान्य संघटना ‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ’ या राज्यस्तरीय संस्थेची 44 वी तर ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ या संस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेनंतर उपस्थित संपादक व पत्रकारांशी संवाद साधताना आ.दीपक चव्हाण बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके, संपादक संघाचे तज्ज्ञ संचालक तथा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांनी केलेल्या मागण्यांचे निवेदन विधीमंडळाच्या गत अधिवेशनादरम्यान आपण ना.अजितदादा पवार यांना दिले होते. आता येत्या अधिवेशनातही पत्रकार व संपादकांचे प्रश्‍न लक्षवेधीद्वारे विधीमंडळासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्यात या प्रश्‍नांबाबत समन्वय साधून या संस्थांच्या शिष्टमंडळाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसमवेत बैठकीचे आयोजन करण्याचाही आपण प्रयत्न करु, असेही आ.दीपक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

वृत्तपत्रांची जाहिरात दरवाढ, पडताळणीतील जाचक अटी, पत्रकारांना देण्यात येणार्‍या तुटपुंज्या सुविधा, अधिस्वीकृती पत्रिकेबाबतचे नियम, ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्माननिधीतील क्लिष्ट अटी, सन्माननिधी वाढीबाबतची प्रलंबित अंमलबजावणी अशा विविध प्रश्‍नांच्या सोडवणूकीसाठी संस्था प्रयत्नशील असून त्यासाठी ना.अजितदादा पवार, आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. छ. श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले, आ.दीपक चव्हाण यांचे सहकार्य वेळोवेळी लाभत असते. येत्या अधिवेशनात या प्रश्‍नांकडे मुख्यमंत्र्यांचे आवर्जून लक्ष वेधावे,अशी मागणी रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी केली.

‘महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे कार्य अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आपण करु. त्यासाठी संस्थेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी योग्य उपाययोजना राबवू. पत्रकारांच्यात एकी होत नसल्याने त्यांच्या प्रश्‍नांकडे शासन दुर्लक्ष करत असते. रविंद्र बेडकिहाळ यांचे पत्रकारांच्या कल्याणासाठी मोठे काम असून भविष्यात एकजुटीने आपण त्यांच्या पाठीशी राहून पत्रकार, संपादक यांचे प्रश्‍न मार्गी लावून घेवूयात, असे विनोद कुलकर्णी म्हणाले.

यावेळी संपादक संघाचे ज्येष्ठ संचालक रमेश खोत (जालना), बाळासाहेब आंबेकर (सातारा), माधवराव पवार (नांदेड), जयपाल पाटील (अलिबाग), बापुराव जगताप, सौ.अलका बेडकिहाळ, अ‍ॅड.रोहित अहिवळे, रोहित वाकडे, प्रसन्न रुद्रभटे, सदस्य उमेश गुप्ता (अंबेजोगाई), कार्यलक्षी संचालक अमर शेंडे, पत्रकार कल्याण निधीचे विश्‍वस्त सुहास रत्नपारखी, गजानन पारखे (पुणे), फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, पत्रकार यशवंत खलाटे - पाटील आदींनी चर्चेत सहभाग घेवून पत्रकार व संपादकांचे प्रश्‍न अधोरेखीत केले.

प्रारंभी रविंद्र बेडकिहाळ यांनी आ.दीपक चव्हाण यांचे स्वागत केले. त्यानंतर विशेष योगदानाबद्दल विनोद कुलकर्णी, बाळासाहेब आंबेकर, जयपाल पाटील, अ‍ॅड.रोहित अहिवळे, यशवंत खलाटे - पाटील यांचा आ.दीपक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमर शेंडे यांनी केले.

 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER