Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ. सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ : रणजीत देशमुख फलटण येथील ओंकार साळुंखे बालगंधर्व परिवार पुरस्काराने सन्मानित विठ्ठल नामाचे उच्चारण ह्रदयाच्या आरोग्यासाठी प्रभावी - डॉ.प्रसाद जोशी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मा. नगरसेवक सनी अहिवळे यांच्या निवासस्थानी भेट फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत ४ जुलै रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव शिस्तीमुळेच मालोजीराजे शेती संकुलाचा विकास होऊ शकला : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण येथील पै.खंडेराव करचे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश : पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांची उपस्थिती माऊलींच्या पालखी सोहळ्याला फलटण येथे विना खंडित वीज पुरवठा : रवींद्र ननावरे यांची माहिती फलटण येथून पालखी प्रस्थाना नंतर पालखी तळाची केवळ तीन तासात स्वच्छता : मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कामाची तत्परता मंगळवार दि.१ जुलै रोजी पालखी तळ स्वच्छता अभियान राबविणार : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर डराडोच्या वतीने वारकरी माऊलींना मोफत चहा,पाणी आणि बिस्कीट वाटप कै.नंदकुमार भोईटे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांची अन्नदान सेवा माउलींच्या स्वागतासाठी फलटणला पूर्वतयारी सुरु : मुख्याधिकारी निखिल मोरे कोळकी येथे 25 जून रोजी बांधकाम कामगार नोंदणी कॅम्प श्री दत्त इंडियाचे १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : अजितराव जगताप माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजे गटाचा पाठिंबा विडणीच्या उपसरपंचपदी मनीषा नाळे बिनविरोध : बहुमतातील लोकनेता तोंडावर पडला - सरपंच सागर अभंग यांचे टीकास्त्र कोळकीसाठी ९० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर : माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती फलटणला होणार अद्ययावत बसस्थानक : आमदार सचिन पाटील धुळदेवचे माजी सरपंच सुभाष शिंदे भाजपात - विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : माजी खासदार रणजितसिंह कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उदघाट्न व 1000 मे. टन गोदामच्या बांधकामाचा शुभारंभ रविवारी विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार संपन्न चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत

बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोक धास्तावले

गजबजणार्‍या बाजारपेठा झाल्या नि:शब्द : छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर
टीम : धैर्य टाईम्स
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्‍या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.

रणजित लेंभे 

पिंपोडे बुद्रुक : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्‍या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरोग्य यंत्रणा जीवतोड मेहनत घेत आहेत. तरीही जिल्ह्यात कोरोनाचे अक्षरशः थैमान सुरू आहे. सोमवार, दि. 12 पासून जिल्ह्यात दररोज एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसात 8762 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दोनच दिवसात 2977 रुग्ण आढळून आल्याने व 71 बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांची झोप उडाली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यापूर्वीच गर्दी टाळण्यासाठी गावागावांतील आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. असे असतानाही ग्रामीण भागात नागरिकांचा, वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. मात्र, गेल्या आठवड्यातील बाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्यामुळे ग्रामीण नागरिकांनी भलतीच धास्ती घेतली असून, काही लोकांनी शेतातील कामांवर भर दिला आहे तर काहींनी घरी सुरक्षित राहण्यास पसंती दिली आहे.

बेडसाठी धावाधाव आणि भीतीचे माहोल; कृतिशील दिलासा हवाय 
जिल्ह्यात पहिल्या लाटेपेक्षा चिंताजनक स्थिती एप्रिल महिन्यात उद्भभवलेल्या दुसर्‍या लाटेत निर्माण झालीय. बाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या, ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लोकांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम आरोग्य विभागाचेच आहे. तपासण्या केल्या की जबाबदारी संपत नाही. जे बाधित आलेत त्यांच्यावर उपचार झालेच पाहिजेत. होम आयसोलेशनमुळे आरोग्य विभागाचा ताण हलका झालेला आहे. मात्र, दुसरीकडे प्रत्यक्ष उपचारार्थ रुग्णांना आवश्यकतेनुसार उपचार, सुविधा मिळायलाच हव्यात. उगाच तपासण्या वाढवल्यात अन् उपचार मिळत नसतील तर सर्वच धावाधाव व्यर्थ ठरेल. दिलासा कृतिशील असायला हवा, हे निश्‍चित.


बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. विनाकारण बाहेर पडणे चुकीचं आहे. आरोग्य प्रशासनाच्या सूचनेचे पालन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता स्थानिक आरोग्य प्रशासनला लसीकरणापासून ते कोविड सेंटरच्या विलगीकरण व सेवा उपलब्ध या संदर्भात लागणार्‍या सुविधा याविषयी सातत्याने पाठपुरावा करण्याविषयी सूचना व प्रयत्न करत असल्याचे सातारा जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER