फलटण प्रतिनिधी :
प्रभाग 13 मध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रचारात आघाडीवर असून प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. तर नुकतीच आमदार सचिन पाटील यांनी कोपरा सभा घेऊन मतदारांना प्रभाग 13 ब मधील सौ. रुपाली अमोल सस्ते यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले, सुशांत निंबाळकर, अमोल सस्ते यांच्यासह मतदान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण शहराच्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शहरातील रस्ते ड्रेनेज वाहतूक समस्या महिला सुरक्षा असे मूलभूत प्रश्न सोडवायचे असतील तर प्रभाग 13 ब मधील सौ. रुपाली अमोल सस्ते यांच्यासारखे तळमळीचे कार्यकर्ते नगर परिषदेमध्ये निवडून गेले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( अजित पवार ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व 27 उमेदवारांना बहुमताने विजय करण्याचे आवाहन शेवटी आमदार सचिन पाटील यांनी केले.











