Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

ओ.बी.सी. जनगणना जातनिहाय व्हावी : अखिल भारतीय माळी महासंघ

टीम : धैर्य टाईम्स

सन २०१० ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, त्यांचबरोबर स्व. गोपीनाथराव मुंडे, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, शरद यादव यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातिगत गणना (SECC 2011 ) केली. मात्र त्याची आकडेवारी जाहीर केली नाही. २०१७ साली देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ ची राष्ट्रीय जनगणना जातनिहाय करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते.

 फलटण : (प्रतिनिधी )

नुकतीच बिहार राज्यामध्ये जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. राज्यस्थान, कर्नाटक ने जात निहाय जनगणना केली आसून छत्तीसगड, ओडिशा, तामिळनाडू मध्ये हि जातनिहाय जनगणना होणार आहे. त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय माळी महासंघ गेल्या ३३ वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. तरी महाराष्ट्र सरकारने ओ. बी. सी. ची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय तात्काळ जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी फलटणला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बी. के. यादव, ओ. बी. सी. नेते बापूराव काशीद उपस्थित होते.

पुढे बोलताना शंकरराव लिंगे म्हणाले, जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र जातनिहाय जनगणना करण्यास केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारप्रमाणे जातनिहाय जनगणना करावी. तसा ठराव ९ जानेवारी २०२० साली विधानसभा सभापती नानासाहेब पटोले यांनी मांडला होता. तो सर्व पक्षांनी एकमताने विधानसभेत मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी शिंदे- फडणवीस सरकारने त्वरीत करावी. देशातील जातनिहाय जनगणना करून ९० वर्षे पूर्ण झाली आहेत, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला अनेकदा पटवून दिले आहे. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व. गोपीनाथराव मुंडे, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंह यादव, शरद यादव यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातिगत गणना (SECC 2011 ) केली. मात्र त्याची आकडेवारी जाहीर केली नाही. २०१७ साली देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ ची राष्ट्रीय जनगणना जातनिहाय करण्याचे आश्वासन लोकसभेत दिले होते. देशात सन २०२१ ची नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. महाराष्ट्रातून जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून सर्व ओबीसी संघटनेतून गावागावातून तसीलदार व जिल्हा अधिकारी त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठवली जात आहेत. धरणे, आंदोलन, उपोषण होत आहेत. तरी सुद्धा सरकारने जातनिहाय जनगणना न केल्यास जनतेतून मोठा उद्रेक होईल. यापुढे ओबीसी समाज जात निहाय जनगणनेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करणार नाहीत. अशी जनजागृती अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन च्या वतीने करत असल्याचे लिंगे यांनी निदर्शनास आणून दिले.

 जातनिहाय जनगणनेचे फायदे, मंडल आयोगाच्या शिफारशी, संकल्प पत्रक स्टिकर, छापून महाराष्ट्र भर ओबीसी जनतेमध्ये त्याच वाटप करून जनजागृती केली आहे. याचाच परिणाम ओबीसी समाजाने जातनिहाय जनगणना न केल्यास जनगणनेस विरोध करण्याऱ्या पक्षांना मतदान न करण्याचा संकल्प केला आहे. तरी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने जातनिहाय जनगणना करावी अशी अग्रही मागणी अखिल भारतीय माळी  महासंघाचे अध्यक्ष उद्योगपती शंकरराव लिंगे यांनी केली आहे.

प्रास्ताविक डॉ. बी. के. यादव यांनी केले तर आभार बापूराव काशीद यांनी मानले.

ओबीसी संघटनेतून गावागावातून तहसीलदार व जिल्हा अधिकारी त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठवली जात आहेत. धरणे, आंदोलन, उपोषण होत आहेत. तरी सुद्धा सरकारने जातनिहाय जनगणना न केल्यास जनतेतून मोठा उद्रेक होईल व यापुढे ओबीसी समाज जात निहाय जनगणनेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना मतदान करणार नाहीत

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER