Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

फलटण नगरपालिका निवडणूक : राजकीय ‘क्लायमॅक्स’ लवकरच – उमेदवारीवरून चर्चांना उधाण

टीम : धैर्य टाईम्स

फलटण (प्रतिनिधी) – नगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी केवळ एकच दिवस बाकी असताना राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. उमेदवारांच्या नावांवरून सर्वच गटांमध्ये तणाव, चर्चा आणि चाचपणी सुरू असून, राजेगट आणि महायुतीचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.



भाजपाकडून समशेरसिंह यांना उमेदवारीची जोरदार चर्चा  


माजी खासदार लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ बंधू फलटण नगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी बाबत भाजपामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरातील व्यापारी वर्ग, तरुण मतदार आणि मधल्या फळीतील कार्यकर्त्यांकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता भाजपाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.


गटातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील याला दुजोरा दिल्याचे बोलले जात आहे. तर अनेकांनी या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. समशेरसिंह यांनी मागील काही दिवसांत शहरातील मतदार, सामाजिक संस्था आणि व्यावसायिकांशी केलेल्या भेटीगाठींमुळे त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित असल्याच्या चर्चा रंगत आहेत.



रामराजे गटाचा पुढचा ‘मोठा’ निर्णय : अनिकेतराजे मैदानात?


दुसरीकडे, 35 वर्षे फलटणच्या राजकारणात वर्चस्व गाजवणारे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्या गटाचा नगराध्यक्ष उमेदवार कोण याविषयी अद्याप मौन बाळगून आहेत. तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण यांच्यावरही नगर पालिकेची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी झगडावे लागणार आहे. मात्र, त्यांच्या गटातही मोठा ट्विस्ट येऊ शकतो अशी चर्चा आहे.


रामराजेंचे सुपुत्र ॲड. अनिकेतराजे यांना पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात उतरवण्याचा निर्णय गटातील काही वरिष्ठांनी मांडल्याचे चर्चा आहे. कायद्याचे सखोल ज्ञान, युवकांमध्ये वाढती ओळख आणि राजेंची परंपरा या तिन्ही कारणांमुळे अनिकेतराजेंचे नाव प्रामुख्याने पुढे येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामराजे यावर आज-उद्याच अंतिम निर्णय घेऊ शकतात.


दोन्ही गटांचा निर्णायक टप्पा – शहरात उत्सुकतेचं वातावरण

शहरातील जनमानसात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तर कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी निश्चितीच्या मुद्यावरून कल्लोळ सुरू आहे. अंतिम उमेदवारी जाहीर होताच फलटणचे राजकारण अजून तापण्याची चिन्हे असून, ‘समशेर विरुद्ध अनिकेत’ अशी थेट लढत रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांचे नाव चर्चेत असले तरीही त्यांचा प्रभाव मात्र जाणवत नसल्याचे जाणकार सांगतात.


महायु्तीचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, यांचा उमेदवारीचा निर्णय पुढील राजकीय दिशा ठरवू शकतो.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER