Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

'दगडूशेठ' गणपती मंदिरात आरोग्यविषयक काळजी घेऊन दर्शनव्यवस्था

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; मंदिरात 'श्रीमहाबुद्धि नवरात्रोत्सवाला' प्रारंभ
टीम : धैर्य टाईम्स
Darshan system with health care in 'Dagdusheth' Ganapati temple
गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषात आणि सनईच्या स्वरात गुरुवारी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. शासन आदेशानुसार घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे खुली झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.


पुणे : गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषात आणि सनईच्या स्वरात गुरुवारी पुन्हा एकदा दगडूशेठ गणपती मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले झाले. शासन आदेशानुसार घटस्थापनेच्या दिवशी मंदिरे खुली झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांनुसार भक्तांची आरोग्यविषयक संपूर्ण काळजी घेत दर्शनव्यवस्था करण्यात आली होती.
मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या दर्शनरांगेत ठराविक अंतरावर पट्टे आखून भाविकांना उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या भाविकांनी मास्क घातला आहे, अशा भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला. भाविकांचे तापमान तपासणी करण्याकरीता व स्पर्शविरहित हात निर्जंतुकीकरण करण्याची सोय ट्रस्टतर्फे दर्शनरांगेमध्ये दोन वेळा करण्यात आली आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना शासन आदेशानुसार मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. भाविकांनी दर्शनासाठी येताना काय नियमावली पाळावी, याचे फलक देखील मंदिर परिसरात लावण्यात आले. हार, फुले, नारळ भाविकांकडून स्विकारण्यात येणार नसल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. तसेच नवरात्रीनिमित्त मंदिराला फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.
मंदिरात श्रीमहाबुद्धि नवरात्रोत्सवाला प्रारंभ
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, नवरात्रोत्सवानिमित्त गणपती मंदिरात श्रीमहाबुद्धि नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. श्रीं ना नवरात्रीमध्ये दररोज विविध नाम असलेली उपरणे परिधान करण्यात येणार आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी बुद्धीपती हे नाम असलेले उपरणे श्रीं ना घालण्यात आले होते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळात गाणपत्य संप्रदायात श्री महाबुद्धी नवरात्र संपन्न केले जाते. भगवान श्री गणेशांच्या उजव्या हाताला विराजमान असणा-या श्री गणेश शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. भगवान तिला आपल्या उजव्या हाताला स्थान देतात, यातच तिचे श्रेष्ठत्व अधोरेखित आहे. अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी सूर्यास्त समयी देवी बुद्धी प्रगट झाली असल्याने त्यादिवशी महाबुद्धी जन्मोत्सव संपन्न केला जातो. त्यामुळे अश्विन प्रतिपदा ते नवमी हे नवरात्र बुद्धी नवरात्र रूपात संपन्न होते.
ते पुढे म्हणाले, मानवी जीवनातील सर्वात श्रेष्ठ आनंद म्हणजे ज्ञानाचा आनंद. ते जगातील ज्ञान विविध बोधांच्या आधारे होत असते. पंचज्ञानेंद्रियांच्या आधारे जगातील विविध पदार्थांचा होणा-या त्या बोधाचा आधार असणारी शक्ती म्हणजे देवी बुद्धी. या बुद्धी नवरात्रामध्ये आपण देवी बुद्धींच्या नऊ नावांचे चिंतन करीत तिचे बौद्धिक अनुष्ठान करीत आहोत. ही बुद्धी भगवान श्रीगणेशांची अत्यंतप्रिय भामिनी असल्याने, ती भगवान गणेशांच्या कृपेने कार्य करीत असल्याने भगवान श्रीगणेशांना बुद्धिपती असे म्हणतात. त्यामुळेच श्रीं ना बुद्धिपती, वागीश्वरीश, महाविद्याधीश, शारदानाथ, प्रज्ञापती, सुमेधानाथ, भारतीभर्ता, ब्रह्मविद्येश, महाबुद्धीश आणि दस-याच्या दिवशी शमीविघ्नेश या नामांचे उपरणे परिधान करण्यात येणार आहे.
श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा देखील जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER