Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

शासनाकडून विशेष मोहीमांच्या जाहीरातींचे वितरण सुरु
टीम : धैर्य टाईम्स

फलटण  : महाराष्ट्र शासनाकडून शासकीय जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाच्या माध्यमातून या संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मंत्रालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देत शासनाच्या विशेष मोहीमांच्या जाहिराती ‘अ’ व ‘ब’ वर्गातील वृत्तपत्रांबरोबर ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांनाही देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेवून शासनाकडून ‘क’ वर्गातील वृत्तपत्रांना या जाहिरातींचे वितरण सुरु झाले असून लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर करण्यात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाला यश आले आहे.

सदर मागणीच्या पाठपुराव्यासाठी रविंद्र बेडकिहाळ यांच्या समवेत फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सचिव रोहित वाकडे, कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.रोहित अहिवळे, प्रसन्न रुद्रभटे, दादासाहेब चोरमले, मयुर देशपांडे, प्रशांत अहिवळे आदींनी पाठपुरावा केला.

या यशाबद्दल सविस्तर माहिती देताना रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले की, ‘‘शासनाच्या ‘लाडकी बहीण योजने’सारख्या सर्व योजनांच्या प्रसिद्धीकरणातून जाहिरात यादीवरील ‘क’ वर्ग संवर्गातील वृत्तपत्रांना वगळून शासनाकडून पक्षपातीपणा सुरु होता. छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने होणारा हा अन्याय दूर होण्यासाठी यापूर्वीही महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ व अन्य सहयोगी संस्थांच्यावतीने शासनास वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना दि.18 ऑगस्ट 2024 रोजी निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा आम्ही दिला होता. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचेही सदर प्रश्‍नाकडे आम्ही लक्ष वेधले होते. यावर विशेषत: आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तात्काळ महासंचालक ब्रिजेश सिंह यांना दूरध्वनी व पत्राद्वारे सदर प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेण्याची शिफारस केली होती. तद्नंतर माझ्या नेतृत्त्वात संपादक संघाच्या शिष्टमंडळाने ब्रिजेश सिंह यांची समक्ष भेट घेवून या प्रश्‍नांसोबत संपादक व पत्रकारांच्या अन्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून शासनाकडून आज दि.6 रोजी ‘मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमा’ची जाहिरात राज्यातील लघु वृत्तपत्रांना वितरित झाली आहे. यामुळे मोठ्या शहरांबरोबरच विशेषत: अगदी छोट्या खेडोपाडी, वाडीवस्त्यांवर वितरित होणार्‍या छोट्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती  शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात मदत होणार आहे.’’

दरम्यान, लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाकडून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण - कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांचे तसेच उपोषणाच्या मागणीला पाठींबा देणार्‍या राज्यातील पत्रकार व संपादकांच्या संघटनांचे महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ व फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांनी आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER