फलटण प्रतिनिधी :
फलटण नगरपालिका निवडणुकीत आज शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या आत्या तथा जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सुनिल नेवसे, दादासाहेब चोरमले, नितीन भैय्या भोसले यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती.
निवडणुकीत राजे गटाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीमुळे शहरातील स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.











