फलटण प्रतिनिधी - अस्तरीकरणाचे काम सुरु असल्याने गेले काही दिवसापासून निरा उजवा कालवा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र फलटण पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागील ८ दिवसांपासुन कालव्यात पाणी सोडण्यासाठी वारंवार आमदार सचिन पाटील यांच्याकडे मागण्या करण्यात येत होत्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार सचिन पाटील यांनी नीरा उजवा कालव्याचे अभियंता यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून तातडीने निरा उजवा कालव्याचा पाणी पुरवठा सुरू करणेत यावा असे आदेश दिले आहेत. यानुसार निरा उजवा कालव्याचा पाणी पुरवठा उद्या दिनांक ०६.१२.२०२५ रोजी सोडण्यात येणार असल्याचे निरा उजवा कालव्याचे अभियंता मोरे यांनी सांगितले.











