Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचा छापा : सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 

विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली असून सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच आहे. 

संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला आहे. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. 

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहे. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे

रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड झाली आहे. 

संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.

दरम्यान, संजीवराजे निंबाळकरांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला. या धाडीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेवर कार्यकर्त्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. 


कृपया गर्दी करू नका ; खात्याला काम करू द्या - आ. रामराजेंचे स्टेटस 

या कारवाई विषयी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून कृपया गर्दी करू नका ; खात्याला काम करू द्या काळजी नसावी अशा प्रकारचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.


देशाला लाखो रुपये देणारंकुटुंब - रघुनाथराजे नाईक निंबाळकर

रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या घरावर व गोविंदवर देखील छापा पडल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत, आजोबा देखील मंत्री होते, पण असं कधी घडलं नव्हतं. देशाला लाखो रुपये देणारं आमचे कुटुंब होतं अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांची साथ सोडल्यानं छापेमारी सुरु आहे का असं वाटत का असं विचारलं असता तसं काही वाटत नाही. प्रक्रियेचा भाग असेल असं वाटतं किंवा असेल सुद्धा तसं काही कल्पना नाही. आम्ही संस्थान विलीन केलं तेव्हा शासकीय कार्यालयं आमच्याच इमारतीत आहेत. लोकशाहीत सामील झालेलं हे घराणं आहे, असं व्हावं हे दुर्दैव आहे, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले.



तालुक्याच्यावतीने या कारवाईचा निषेध - मा.आ. दीपकराव चव्हाण 


सदरची कारवाई ही राजकीय स्वरूपाची आहे असे वाटत नाही. आम्ही सर्वजण तालुक्याच्यावतीने या कारवाईचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया मा. आ. दिपकराव चव्हाण यांनी दिली आहे. अशा पद्धतीने व अशा प्रकारची कारवाई होणे या संस्कृतीत अपेक्षित नाही. कारण गेली तीन पिढ्या राजे कुटुंब राजकारणामध्ये कार्यरत आहेत. आजवरच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कोणत्याही

प्रकारचा डाग लागलेला नाही. अश्या पद्धतीचे स्वच्छ चारित्र्याचे राजकारण त्यांनी केले असताना, ज्यावेळी अशा पद्धतीची कारवाई होते त्यावेळी निश्चितपणे या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. ही कारवाई राजकीय आहे की नाही हे सांगता येणार नाही.

कारवाई अपेक्षित नाही. आयकर कीईडी अशा अफवा याबाबत काही सांगता येणार नाही कारण देशात काय चालू आहे हे आपणास माहिती आहे. याचा अर्थ तालुक्यामध्ये तशाच प्रकारची कारवाई आहे काय हे आत्ताच सांगू शकत नाही असे ही आमदार चव्हाण म्हणाले.


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER