Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

राखूया समतोल पर्यावरणाचा, तोच सन्मान निसर्गाचा      

टीम : धैर्य टाईम्स
निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी आपली वसुंधरा जपणे गरजेचे आहे. आपली वसुंधरा समृद्ध असावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ’माझी वसुंधरा अभियान 2.0’ ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेले ’माझी वसुंधरा अभियान’ हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

 पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही दिसू लागल्याने याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने 1972 साली युनोच्या एका परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरले. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आणि संवर्धनाची गरज लक्षात घेऊन विविध प्रकल्प राबविले जात आहेत.  पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरणाचे जतन, संवर्धन केले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी आपली वसुंधरा जपणे गरजेचे आहे. आपली वसुंधरा समृद्ध असावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ’माझी वसुंधरा अभियान 2.0’ ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेले ’माझी वसुंधरा अभियान’ हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण संवर्धन - 
पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे संवर्धन या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. वायू तत्त्वाचे संवर्धन करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्‍चित करून सायकलचा वापर करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
जलतत्त्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण याचा समावेश आहे. अग्नी तत्त्वाशी संबंधित उर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध यासारख्या जागांवर राबवणे आणि आकाश या तत्त्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्‍चित करुन मानवी स्वभावांतील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमातून जनमानसात बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे. 
निसर्गपूरक जीवनपद्धती -
निसर्गाच्या या पंचतत्त्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करुन निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ’माझी वसुंधरा अभियान’  राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे अडीच लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
वृक्षगणना,रोपवाटिकेची निर्मिती,वृक्ष आराखडा,एकल वापर प्लास्टिक बंदी,घनकचरा व्यवस्थापन,जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन,ई-कचरा व्यवस्थापन,निगडीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने पुढाकार, राडारोडा कचर्‍याचे व्यवस्थापन,कृषी कचरा व्यवस्थापन, उज्ज्वला योजना आणि गॅस जोडणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग,विहीर पुर्नस्थापना उपक्रम,पर्यावरणपूरक मूर्तीचा प्रचार,सौर ऊर्जेला प्रोत्साहन अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी निश्‍चितच मदत होणार आहे.
पुणे प्लॉगेथॉन 2022 -
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे 5 जून रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत प्लॉगेथॉन (जॉगिंग विथ पिकिंग अप लिटर) मोहिम राबविण्यात येत आहे. व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकांना सकाळी फिरण्याची सवय असते.याला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल. पुणे शहरातील एकूण 134 रस्ते यासाठी निश्‍चित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर विविध टेकड्या रामनदी,पुणे शहरातील विविध नदी घाट व क्रॉनिक्स स्पॉट या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. 
पर्यावरण आणि आपले नाते जिवाभावाचे आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतीचा केवळ निसर्ग नाही, तर हवा, पाणी, जमीन, वनस्पती या सर्वांनी मिळून पर्यावरण बनते. मानवाला जगण्यासाठी या सर्वांची गरज असते. त्यामुळे आपल्या सर्वांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे ती पर्यावरण रक्षणाची. या जबाबदारीचे भान करून देण्यासाठीच पर्यावरण दिन आहे.

गीतांजली अवचट, माहिती सहायक,
विभागीय माहिती कार्यालय, पुणे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER