Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा फलटणमध्ये डी-मार्ट बांधकाम वादाच्या भोवऱ्यात फलटण येथे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी व पत्रकारांची ग्रेट भेट कोळकीत साखळी चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन व मंगळसूत्र लंपास विक्रम गॅस एजन्सीचा भोंगळ कारभार : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला तब्बल चार लाख रुपयांचा दंड पंचायत समितीला पठाणी हिसका : लाखोंचा गैरव्यवहार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आमदार सचिन पाटील यांचा वाढदिवस रद्द भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार? जाणून घ्या सत्य शहर हद्दवाढ, स्टेडियम यासह एकूण ४६ ठराव मंजूर - फलटण नगरपरिषद सर्वसाधारण सभा श्री जितोबा विद्यालय जिंती येथे गर्भाशय मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न गोरगरीब जनतेच्या नेत्याचा खरा वारसदार – समशेरसिंह नाईक निंबाळकर डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर; उषा मंगेशकर व पद्मिनी कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत ५ एप्रिलला भव्य सोहळा आमदार सचिन पाटील यांच्या फंडातून कोळकी जिल्हा परिषद गटात सौर दिवे व रस्त्यासाठी निधी मंजूर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव नक्कीच इतर महिलांना प्रेरणादाई - सौ. रेश्माताई भोसले ज्येष्ठ समाजसेवक व ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन निर्भीड पत्रकारितेचा बुलंद आवाज : ज्येष्ठ संपादक शामराव अहिवळे ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या फलटण तालुका अध्यक्षपदी गणेश दडस तर उपाध्यक्षपदी अंगराज जाधव राजकारण्यांनी ओबीसी समाजाला फसविले - प्रा. लक्ष्मण हाके हॉटेल व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणीत, ताबडतोब गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्या,फलटण हॉटेल असोसिएशन ची मागणी फलटणमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्त भव्य हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेचे आयोजन पंतप्रधान मोदींची माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट; माढा मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार ओबीसी समाजावर अन्याय ? जातीय समीकरणात दोन्हीही निंबाळकर एकत्र ? तालुक्यात चर्चांना उधान ! फलटण शहरासह उपनगरांत विजेचा खेळखंडोबा; नागरिक आणि व्यावसायिक त्रस्त

पोलीस बांधवांचा बीज राखी या अनोख्या संकल्पनेसह रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

टीम : धैर्य टाईम्स
बीजराखी  म्हणजे आपल्या आसपास ज्या वृक्षवल्ली आहेत त्यांच्या बिया असतात त्या बियांपासून राखी तयार करायची आणि राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्या राखी मधील बिया कुंडीत टाकून एखादे चांगलं झाड वाढवू शकतो. हि अतिशय अनोखी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनकडून राबवण्यात आली.

  सर्वांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिस बांधवांप्रती आपले प्रेम, स्नेह व ऋनुबंध घट्ट करण्यासाठी आज राखी पौर्णिमेचे औचित्य साधून   ऑन धिस टाईम मीडिया प्रा. लि., माहेर कट्टा व तिरंगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पोलीस बांधवांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम  मुधोजी महाविद्यालय, फलटण एन.एस.एस. विभाग, एन.सी.सी. विभाग आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन व लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम यांच्या सहभागाणे  अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमध्ये फलटण पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस बांधवाना लायन्स क्लब च्या भगिनी आणि एन.एस.एस. च्या विध्यार्थीनी व एन.सी.सी विध्यार्थीनी यांनी राखी बांधून भाऊ-बहीण यांच्या गोड नात्याचा ऋनुबंध घट्ट केला. 
   आजच्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 'बीजराखी' ची संकल्पना. बीजराखी  म्हणजे आपल्या आसपास ज्या वृक्षवल्ली आहेत त्यांच्या बिया असतात त्या बियांपासून राखी तयार करायची आणि राखी पौर्णिमा झाल्यानंतर त्या राखी मधील बिया कुंडीत टाकून एखादे चांगलं झाड वाढवू शकतो. हि अतिशय अनोखी आणि एक वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनकडून राबवण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लायन्स क्लब ऑफ फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने 75 भारतीय झेंड्याचे याप्रसंगी वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ पत्रकार कार्यक्रमाचे अध्यक्ष  मा श्री रवींद्र बेडकीहाळ सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, 'पोलीस यंत्रणा नेहमीच आपले कार्य कर्तव्य निष्ठेने पार पाडत असते. सर्व विभागांमध्ये कामाचे टाईम लिमिट असते परंतु पोलीस यंत्रणेला कुठलेही वेळेचे बंधन नाही त्यांना सदैव तत्पर राहावे लागते. आपण अशा सांस्कृतिक कार्यक्रममधून त्यांना आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली तर आपल्या कर्तव्य विषय प्रेम व आपुलकी वाटून समाजाच्या प्रती ते अजून जोमाने काम करू शकतील. त्यांना वर्षभर प्रत्येक सणाला आपल्या घरी बोलवून आपण त्यांना आपल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी केलं तर त्यांचे मनोबल  वाढून आपलं कर्तव्य पार पाडताना त्यांना आनंद मिळेल.
याप्रसंगी मधोजी महाविद्यालयचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार सर, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. निलम देशमुख मॅडम, प्रा.पडवी सर यांनी तर पोलीस विभागातर्फे गायकवाड मॅडम व नाळेसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मानव अधिकारचे समीर तांबोळी, लायन्स क्लब ऑफ फलटण (गोल्डन) च्या चार्टर प्रेसिडेंट सौ. उज्वला निंबाळकर , गोल्डन अध्यक्षा सौ. सुनंदा भोसले, गोल्डन सेक्रेटरी सौ. सुनीता कदम, सौ. नीलम देशमुख,सौ. वृक्षला भोसले या उपस्थित होत्या. तर लायन्स क्लब ऑफ प्लॅटिनम यांच्या वतीने अध्यक्षा एमजीएफ ला.सविता दोशी, संस्थापक अध्यक्षा एमजीएफ ला. नीलम लोंढे-पाटील, सदस्य ला. सौ. मीना निंबाळकर, ला. मंगल घाडगे, ला. रश्मी चव्हाण, ला. शिवानी गांधी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी डोहेस या NGO तर्फे सौ. सरोजिनी अहिवळे आणि ऑन दिस मीडिया प्रायव्हेट लिमिटेड चे पुणे विभागातर्फे जीएम केळकर सर हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शितल अहिवळे सर यांनी केले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानण्याचे काम एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी केले.  पोलीस उपाधीक्षक तानाजी बरडेसाहेब, पोलीस निरीक्षक फलटण शहर किंद्रेसाहेब, पोलीस निरीक्षक ग्रामीण गोडसेसाहेब, यांचे  या कार्यक्रमासाठी सहकार्याबद्दल  विशेष आभार मानण्यात आले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER