फलटण प्रतिनिधी –
फलटण नगरपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केला.
सत्कार स्वीकारताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी हा विजय फलटणकर जनतेचा असल्याचे सांगत, नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. शहरातील मूलभूत सुविधा, विकासकामे व लोकहिताचे निर्णय प्राधान्याने राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.











