Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा

पीक हमीभाव वाढ- शेतक-यांना दाखविलेले गाजर : अशोकराव थोरात

तर महाराष्ट्रातील त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील
टीम : धैर्य टाईम्स
शेतक-यांना समजून घेवून, निर्णय घेवून राबविले नाहीत तर शेतक-यांचा दिल्लीला पडलेला वेढा प्रत्येक राज्यात पडेल व सध्या केंद्र सरकारला शेतक-यांनी वेढीस धरले आहे. याचा आनंद मानणारे कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस इत्यादी विरोधकांनाही शेतक-यांचा वेढा पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारला शेतक-यांच्या आंदोलनाची झळ बसलेली नाही.महाराष्ट्र सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्रिकोणी सरकारला शेतकरी तिलांजली देतील. महाराष्ट्र सरकारच्या आमदार, मंत्री, सरकारी अधिकारी यांचेपेक्षाही शेतक-यांना स्वत

कराड : या वर्षाच्या खरीप हंगामातील विविध पिकांच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने वाढ जाहीर केलेली आहे.सदरची हमीभाव वाढ ५० ते ६० टक्के दिसत असली तरी ती फसवी आहे. आम्ही शेतक-यांसाठी काही करतो हे दाखविण्याचा प्रयत्न केंद्र शासनाने केला आहे. परंतू आता शेतकरी अशा फसव्या घोषणांना फसणार नाही. याची नोंद राज्य व केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असे आवाहन कृषीमित्र अशोकराव थोरात यांनी केले आहे. थोरात म्हणाले, खरीप हंगामातील पिकांना मिनीमम सपोर्ट प्राईस म्हणजेच हमीभाव मोठ्या प्रमाणात वाढविला म्हणजे तो शेतक-यांना प्रत्यक्ष मिळतो असे नाही. बाजारामध्ये ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन,उडीद, तुर, मुग,सुर्यफुल, करडई यासह सर्व पिकांचा हमीभाव ठरविताना समग्र उत्पादन खर्च ग्रहीत धरला जात नाही. त्यामध्ये बियाणे, जमीनीची मशागत, रासायनिक खते, इतर खते इंधन याचे वाढलेले दर धरले जात नाहीत. तसेच पीक विम्यातील तोटा धरला जात नाही. पिकाचा संपूर्ण उत्पादन खर्च काढण्याची शरद जोशी व डॉ.स्वामीनाथन यांनी सुचविलेली पध्दती वापरली जात नाही. त्यामुळे पीक हमीभावा इतकाच किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन खर्च असतो त्यामुळे वाढीव हमीभावाचा शेतक-यांना फायदा होत नाही. हमी भावाप्रमाणे शेतमाल खरेदीची यंत्रणा बाजारात राज्य किंवा केंद्र सरकार पुरेशी उभी करत नाही.सरकार उशिरा खरेदी सुरू करते, संपूर्ण माल खरेदी करत नाही तर २०-२५ टक्केच शेतमाल खरेदी केला जातो. व्यापारापेक्षाही शासकीय खरेदीत अनागोंदी असते आणि म्हणून शेतक-यांना हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारांना माल विकावा लागतो. राज्यातील बाजार समित्या व्यापारी, अधिकारी व राजकीय नेत्यांचे शेतक-यांना लुबाडण्याचे ठिकाण झाले आहे. बाजार पेठेत काही शेतीमाल उदा. कडधान्ये, डाळी, सुर्यफुल इत्यादींची आवक कमी असते. तर गहू, भात किंवा तांदूळ, मका मोठया प्रमाणात असतो व शासन गहू, तांदूळ पिकविणारा शेतकरी लॉबीचेच हित बघत असते. म्हणजेच सर्व शेतक-यांना व सर्व पिकांना समान न्याय मिळत नाही. शासनाची भूमिका कायम व्यापा-यांचे व काही प्रमाणात ग्राहकांचे हित बघण्याकडेच असते. त्यामुळे कुठल्याही शेतमालाच्या किंमती वाढायला लागल्या की प्रसिध्दी माध्यमापासून तथाकथीत तज्ञांपर्यंत सर्वजण महागाईची आरोळी देतात व केंद्र व राज्य सरकार शेतक-यांची बाजू न घेता महागाई कमी करायचे उपाय योजतात. डाळी, तेल,कडधान्यांची आयात केली जाते. हाच प्रकार कांदा, दुध पावडर, फळे याबाबतही केला जातो. सरकारच्या अशा प्रकारच्या धोरणाचे स्वागत व्यापारी, शेतमाल प्रक्रिया करणारे कारखानदार सतत करतात. शेतमाल हमी भाव वाढविताना शासनाने प्रत्येक शेतीमालाचा समग्र उत्पादन खर्च ग्रहीत धरला पाहिजे.ज्यापिकाचे उत्पादन सध्या भरपूर आहे. त्यांचे हमीभाव कमी प्रमाणात वाढवून तेलबिया, डाळी सारख्या पिकांचे हमीभाव मोठया प्रमाणात शेतक-यांना परवडेल असे वाढवून समतोल साधला पाहिजे. शेतीसाठी पायाभूत सुविधा वीज, रस्ते, पाणी, बाजारपेठा प्रक्रिया करणारी केंद्रे उभी केली पाहिजेत. शेतीमध्ये तरूण वर्ग खेचण्यासाठी शेती,शेतीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. शेतीत नफा राहिला तरच तरूणवर्ग शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळणार आहे. यासाठी राज्य सरकारने व केंद्र शासनाने एकत्रित विचार करून शेतीसाठीचे दीर्घ मुदतीचे शाश्वत नियोजन केले पाहिजे. फक्त हमीभाव वाढवून शेतीमध्ये सुधारणा होणार नाही.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER