Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

प्रभाग क्र. १ मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवा

गंभीर दुर्घटना घडल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार : सौ. सीता हादगे
टीम : धैर्य टाईम्स
Fill the potholes on the roads
प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे येत्या ४८ तासांच्या आत तात्काळ बुजविण्यात यावेत, ते न बुजवल्यास त्या खड्डयांमध्ये वृक्षरोपण करण्यात येईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयांमध्ये वाहन आदळून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सातारा शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे येत्या ४८ तासांच्या आत तात्काळ बुजविण्यात यावेत, ते न बुजवल्यास त्या खड्डयांमध्ये वृक्षरोपण करण्यात येईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयांमध्ये वाहन आदळून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे, असा इशारा सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. सीता राम हादगे यांनी एका निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

निवेदनात म्हटले आहे, की काही महिन्यांपूर्वी सातारा शहरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यांची खड्डयामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. प्रभाग क्रमांक १ मधील कराड- महाबळेश्वर मार्गावर आणि सातारा - कोरेगाव मार्गावर तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी म्हणजेच ज्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर संपतो त्या परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असणार्‍या सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी सहा ते आठ इंच खड्डे पडले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे लक्षात येत नसल्यामुळे दुचाकी वाहनचालकांचा या खड्डयात दुचाकी आदळून कपाळमोक्ष होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. दोनच दिवसापूर्वी दिवसाढवळ्या दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेची दुचाकी या खड्डयात आदळून दुचाकीवरील महिला व तिच्या सोबत असणारा मुलगा रस्त्यावर पडून जखमी झाले. याचवेळी पाठीमागून वेगाने वडाप जीप येत होती. सुदैवाने जीप चालकाने जीपवर नियंत्रण मिळवल्यामुळे फार मोठा अनर्थ टळला.

थोडक्यात प्रभाग क्रमांक १ मधील तहसीलदार कार्यालय परिसरातील दुतर्फा असणार्‍या सेवा रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.  गेल्या अनेक दिवसापासून खड्डे पडूनही ते बुझविण्याकडे आपल्या विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक बाब आहे. काही वर्षापूर्वी तहसीलदार कार्यालय परिसरात असणाऱ्या मंडईतून मंडई खरेदी करून एक दुचाकीचालक घरी परतत असताना पोवई नाका परिसरात असणाऱ्या जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीसमोर असणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्डयात दुचाकी आदळली. दरम्यान पाठीमागून वेगाने येणाऱ्या वाहनाने त्या दुचाकी चालकाला जागीच चिरडल्याची घटना घडली होती. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहत असाल तर जनता तुम्हाला नक्कीच माफ करणार नाही.
 

खड्डयात वृक्षारोपण करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेणार !

प्रत्येक वाहनचालक प्रामाणिकपणे रस्त्यांचा कर भरत असतो. अशावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहन चालकांना उच्च दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्याची गरजच नव्हे, तर ती त्यांची बांधिलकी आहे. एखादे वाहन चालकाने टॅक्स भरला नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित विभागाकडून त्याच्यावर धडक कारवाई केली जाते. ही कारवाई करण्यात जेवढी तत्परता दाखवली जाते, तेवढीच तत्परता सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत का दाखवत नाही? मोठा प्रश्न वाहनचालकांचा सर्वसामान्य जनतेला पडत आहे. येत्या ४८ तासात प्रभाग क्रमांक १ मधील आपल्या हद्दीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे न बुजविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून त्याच खड्डयामध्ये वाहनचालकांना समवेत घेऊन वृक्षारोपण केले जाईल. ४८ तासानंतर त्याच खड्डयांमध्ये वाहन आढळून एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. कृपा करून ही वेळ येऊन न देता खड्डे तात्काळ बुजवावेत, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER